Crime News Saam tv
महाराष्ट्र

Crime News : नगरमधील करंजी घाटात आढळला जळालेला मृतदेह; परिसरात उडाली एकच खळबळ

कल्याण निर्मल महामार्गावरील अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात करंजी घाटात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे.

साम टिव्ही ब्युरो

सुशील थोरात

अहमदनगर : अहमदनगरमधून धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. कल्याण निर्मल महामार्गावरील अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात करंजी घाटात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. अज्ञात व्यक्तीचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

कल्याण निर्मल महामार्गावरील अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात करंजी घाटात एका अज्ञात व्यक्तीचा जळालेल्या अवस्थेत कवटी व हाडाचा सापळा आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

पाथर्डी तालुक्यातील करंजी घाटात एका अज्ञात व्यक्तीचा जळालेल्या अवस्थेत कवटी व हाडाचा सापळा सापडल्याची माहीती करंजी पोलीसांना मिळाली असता पोलिसांनी घटनास्थळी जाऊन घटनेची पाहणी केली. तेथे कवटी आणि हाडाचा सापळा पूर्णपणे जळालेल्या अवस्थेत आढळला. हा मृतदेह लहान मुलाचा की मोठ्या व्यक्तीचा स्त्रीचा की पुरुषाचा हे वैद्यकीय अहवालानंतर समजू शकणार आहे.

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली असता पोलीस उपाधीक्षक अजित पाटील,स्थानिक गुन्हे विभागाचे पोलीस निरीक्षक अनिल कटके,पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, यांच्यासह अहमदनगर वैद्यकीय पथक घटनास्थळी दाखल झाले असून संध्याकाळपर्यंत पाथर्डी पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद झालेली नव्हती.

धक्कादायक! फरशीवर डोके आपटून सुनेचा खून

जगभरात जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात असतानाच पुण्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. घरकाम जमत नसल्याचा आरोप करुन सासूने सुनेचे डोके फरशीवर आपटून तिचा खून केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील लोहगाव भागात घडली आहे. या प्रकरणी विमानतळ पोलिसांनी सासूला अटक केली आहे. महिला दिना दिवशीच या धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ माजली आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मध्य रेल्वे धावत्या लोकलमधून महिला पडली

अमृता फडणवीसांकडून जेवणासाठी निमंत्रण; मनोज जरांगेंनी काय उत्तर दिलं? पाहा VIDEO

मी आरक्षण सोडण्यास तयार; केंद्रीय मंत्र्यांचं मोठं विधान, पण ठेवली ‘ही’ अट

Main Door Vastu Tips: घराच्या दरवाज्याविषयी 5 महत्वाच्या गोष्टी प्रत्येकाला माहित असायला हव्यात

Ganesh Chaturthi 2026: यंदा गणपती बाप्पांचं आगमन ठरणार विशेष; हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी, जाणून घ्या पुजेचा मुहूर्त

SCROLL FOR NEXT