Ahmednagar Crime Saam tv
महाराष्ट्र

Ahmednagar Crime : कामावरून काढून टाकल्याने हमालाने आखला प्लॅन; कांदा व्यापाऱ्यावर हल्ला करत ५० लाख लांबवीले, पाच जण पोलिसांच्या ताब्यात

Ahmednagar News : कांदा व्यापारी समीर शेख व त्यांच्या बंधूवर अज्ञातांनी धारदार शस्त्राने हल्ला करत ५० लाखांची रोकड लंपास केल्याची घटना ७ सप्टेंबरला भर दिवसा कांदा मार्केटच्या समोर घडली

Rajesh Sonwane

सुशील थोरात

अहमदनगर : हमाली काम करणाऱ्याने एकाने मालकाचा घात केल्याचा प्रकार घडला होता. यात कांदा व्यापाऱ्यावर हल्ला करून ५० लाख रुपयांची रक्कम लंपास केली होती. या आरोपीना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून पोलिसांनी २० लाख रुपयांची रोख रक्कम हस्तगत केली आहे. 

कांदा व्यापारी समीर शेख व त्यांच्या बंधूवर अज्ञातांनी धारदार शस्त्राने हल्ला करत ५० लाखांची रोकड लंपास केल्याची घटना ७ सप्टेंबरला भर दिवसा कांदा मार्केटच्या समोर घडली होती. या हल्ल्यात व्यापारी शेख हे गंभीर जखमी झाले होते. याबाबत पोलिसात तक्रार देण्यात आली होती. घटनेचे गंभीर्य बघता पोलीस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तसेच तांत्रिक दृष्ट्या तपास करत ४ आरोपी राहूरी येथून तर एका आरोपीला अहमदनगरमधून अटक केली आहे. 

कामावरून काढून टाकल्याचा राग 

विशेष म्हणजे अटक करण्यात आलेल्या आरोपीमध्ये हमालांचा समावेश आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीमध्ये मुबारक अत्तार, सुनील माळी,अक्षय बाचकर, मयूर गायकवाड, मनोज शिरसाठ यांचा समावेश आहे. तर मुबारक आत्तार हे व्यापारी शेख यांच्याकडे कामाला होता. मात्र दोघांमध्ये वाद झाल्याने व्यापारी शेख याने हमाल आत्तार याला कामावरून काढले होते. दरम्यान हमाल आत्तार आणि त्याचा मित्र हमाल संजय चव्हाण यांनी व्यापारी शेख यांना लुटण्याचा प्लॅन आखला. फरार असलेल्या सहकाऱ्यांना हाताशी धरून हल्ला चढवला असल्याचे कबूल केले आहे. यामध्ये पोलिसांनी ५ आरोपीना अटक केली असून फरार असलेल्या ५ जणांचा शोध पोलीस घेत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: परळीत भाजप गटनेते पवन मुंडे यांच्या पुतण्याला टोळक्याकडून मारहाण

Thane News: ठाणे हादरले! शिवसेना नेत्याचा गोळीबारात मृत्यू, १ मिनिटं २ सेकंदाचा थरारक VIDEO समोर

ज्ञानेश कुमारांना हटवण्यासाठी काँग्रेसचा प्लॅन? काँग्रेसच्या बैठकीत राहुल गांधींची आक्रमक भूमिका

लाडकींसाठी पुन्हा अर्ज भरण्यासाठी संधी? लाडकींना ई-केवायसीही करता येणार?

Wednesday Horoscope: चिंता सोडा, आनंदाची बातमी मिळेल! या 6 राशींना मिळणार मानसिक समाधान, वाचा बुधवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT