Ahmednagar: काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळेंवर विनयभंगाचा गुन्हा
Ahmednagar: काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळेंवर विनयभंगाचा गुन्हा सचिन आगरवाल
महाराष्ट्र

Ahmednagar: काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळेंवर विनयभंगाचा गुन्हा

सचिन आगरवाल

सचिन आगरवाल

अहमदनगर: अहमदनगर Ahmednagar शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे Kiran Kale यांच्यासह आठ ते दहा जनांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात MIDC Police Station विनयभंग, बळजबरीने कार्यालयात प्रवेश करून दमदाटी करणे या कारणास्तव गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

किरण काळे हे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात Balasaheb Thorat यांचे विश्वासातील कार्यकर्ते मानले जातात. त्यामुळे किरण काळे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.

हे देखील पहा-

काँग्रेसचे Congress अहमदनगर शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी काही कार्यकर्त्यांसोबत एमआयडीसी येथील आयटी पार्कला नुकतीच भेट दिल् होती. यावेळी त्यांनी येथील बजाज फायनान्स, बजाज फिन्सर कंपनीचे कॉल सेंटर इथे बळजबरीने प्रवेश करून येथील तक्रारदार महिलेचा हाथ पकडून ओढले आणि लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन त्यांनी केले होते.

मी तुम्हाला सोडणार नाही;

तसेच कार्यालयातील महिलांना दमदाटी करत मी काँग्रेस पक्षाचा शहर जिल्हा अध्यक्ष आहे, माझ्या नादी लागू नका, सगळे धंदे बंद करा, मी तुम्हाला सोडणार नाही असे म्हणत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली अशी तक्रार पीडित महिलेने दिली आहे. या तक्रारी वरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात आईपीसी कलम 452, 354,504, 506 नुसार किरण गुलाबराव काळे आणि इतर आठ ते दहा जनांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक युवराज आठरे पुढील तपास करत आहेत.

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election: लोकसभा निवडणुकांच्या अखेरच्या टप्प्यात अस्तित्वाचं 'राज'कारण

Maharashtra Election: नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांच्या बॅगांचं चेकिंग; चेकिंग नव्हे स्टंटबाजी, ठाकरे गटाचा आरोप

Swati Maliwal Assault Case : 'माझ्याबाबत जे घडलं ते,...; मारहाणीच्या घटनेनंतर आप नेत्या स्वाती मालीवाल यांची पहिली प्रतिक्रिया

Mega block : मध्य रेल्वेवर आजपासून पंधरा दिवस ब्लॉक; कोणत्या मार्गांवर होणार परिणाम? जाणून घ्या

Maharahstra Election: अजित पवार गेले कुठे? अखेरच्या टप्प्यात अजित पवारांची प्रचाराकडे पाठ?

SCROLL FOR NEXT