Ahmednagar News Saam Tv
महाराष्ट्र

Ahmednagar News: देशविरोधी देत होते घोषणा, शिवसेनेच्या युवा नेत्याने भर कोर्टात दिला चोप

Ahmednagar Bhingar News: देशविरोधी देत होते घोषणा, शिवसेनेच्या युवा नेत्याने भर कोर्टात दिला चोप

साम टिव्ही ब्युरो

>> सुशील थोरात

Ahmednagar Bhingar News: स्वातंत्र्यदिनी भुईकाेट किल्ल्यावर भारतविरोधी घाेषणाबाजी करणाऱ्या युवकांना न्यायालयासमाेर शिवसेनेच्या शिंदे गटाच्या युवा पदाधिकाऱ्याने चाेप दिला आहे. ही घटना बुधवारी दुपारी घडली.

अचानक घडलेल्या या घटनेमुळे न्यायालयात एकच गाेंधळ उडाला हाेता. न्यायालयाच्या आदेशानुसार शिवसेनेच्या शिंदे गटाचा युवा संघटक अमाेल हुंबे याला भिंगार कॅम्प पाेलिसांनी ताब्यात घेतले आहे.

भुईकाेट किल्ल्यावर स्वातंत्र्य दिनी सैयद तौकीर आरिफ तौकीर, परवेज इजाज पटेल मकसुद वसिम शेख, साद साजीद तांबोळी आणि अरबाज उर्फ बंबई शेख या पाच जणांनी भारताविराेधात घाेषणाबाजी केली हाेती. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नाेंद झाली आहे. आर्म्ड बेसिक ट्रेनिंग रेजिमेंटमधील हवालदार प्रशांत कुमार चंदेश्वरसिंग यांनी फिर्याद दिली होती. (Latest Marathi News)

आरोपींना भिंगार कॅम्प पोलिसांनी दुपारच्या सुमारास न्यायालयात आल्यानंतर शिवसेनेच्या युवा संघटक अमाेल हुंबे यांनी न्यायालयातच चोप दिल्याने एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी हुंबे यांना ताब्यात घेऊन भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनमध्ये नेले आहे.

तर शिवसेनेच्या शिंदे गटाचे सर्व पदाधिकारी भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनमध्ये ठाण मांडून आहेत. यापुढे अहमदनगर जिल्ह्यात कोणी महापुरुषांना विरोधात अथवा देशविरोधी कृत्य करत असेल त्यांना अशाच प्रकारे शिवसेना स्टाईल उत्तर दिले जाईल, असा इशारा शिवसेनेचे शहर जिल्हाध्यक्ष दिलीप सातपुते यांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT