बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या चिमुकलीची अखेर मृत्यूशी झुंज संपली SaamTv
महाराष्ट्र

Nagar : बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या चिमुकलीची अखेर मृत्यूशी झुंज संपली

अकोले तालुक्यातील सुगावा येथे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या चिमुकलीचे अखेर आज निधन झाले.

गोविंद साळुंके

अहमदनगर : अकोले तालुक्यातील सुगावा येथे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या चिमुकलीचे अखेर आज निधन झाले. दोन दिवसांपूर्वी घरासमोरच्या अंगणात खेळत असताना अचानक बिबट्याने हल्ला करून माई नावाच्या या चिमुकलीला बिबट्याने जबड्यात पकडले होते.

हे देखील पहा :

दरम्यान, हा बिबट्या चिमुकलीला जबड्यात पकडून उसामध्ये घेऊन जात असताना अचानक गावातीलच दूधवाल्याला हा प्रकार नजरेस पडला. त्याच्या गाडीच्या आवाजाने या चिमुकलीला त्या ठिकाणी सोडून बिबट्याने उसामध्ये धूम ठोकली. दीड वर्षीय माई जनक वैद्य ही चिमुकली बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर रित्या जखमी झाली होती.

बिबट्याच्या जबड्यातून दैव बलवत्तर म्हणून ती वाचली. प्रथम अकोले येथे तिच्या वर उपचार सुरु होते. तिच्या परिस्थितीत विशेष सुधारणा होत नसल्यामुळे त्याच रात्री तिला पुढील उपचारासाठी लोणी येथे रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, दोन दिवसांपासून तिची मुत्युशी सुरु असलेली झुंज अपयशी ठरली. आज तिची प्राणज्योत अखेर मालविली. तिच्या निधनाबद्दल परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India Fort : १५ ऑगस्टला फिरण्याचा प्लान करताय? देशभक्तीची भावना जागवणाऱ्या 'या' ऐतिहासिक स्थळांना नक्की भेट द्या

Maharashtra News Live Update : आंबोली-चौकुळच्या सड्यावर कोल्ह्यांच्या कळपाचा मुक्त खेळ

Fitness Tips: जिमला जाण्याची गरज नाही! फिट आणि अॅक्टिव्ह राहण्यासाठी ‘या’ ७ सवयी लावा

Mumbai Police: ड्रग्ज खरेदी करताना पोलिसाला अटक, मुंबई पोलिस दलात खळबळ

Independence Day Marathi Speech : १५ ऑगस्टला भाषण देताय? हे 10 मुद्दे लक्षात ठेवा; भाषण ऐकून सर्वच करतील कौतुक!

SCROLL FOR NEXT