Sangamner News Saam tv
महाराष्ट्र

Sangamner News : दुध संघांच्या विरोधात भाजपचे आंदोलन; शासन निर्णयाच्या अंमलबजावणीची मागणी

Ahmednagar News : सरकारने दुधाला ३४ रूपये दर जाहीर केला असताना दूध संघांनी शेतकऱ्यांची दिशाभूल करून महायुती सरकारची बदनामी थांबवावी

Rajesh Sonwane

सचिन बनसोडे 

संगमनेर (अहमदनगर) : दूध दर प्रश्नावर विरोधक आक्रमक होऊन आंदोलन करत आहेत. याच दरम्यान आता भाजप (BJP) देखील आंदोलन करताना दिसून येत आहे. दूधाला ३४ रुपये दर देण्याच्या शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी खासगी आणि सहकारी दूध संघानी करावी; या मागणीसाठी संगमनेर (Sangamner) येथे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात किर्तनकार इंदोरीकर यांच्या‌ सासूबाई शशिकला पवार या देखील सहभागी झाल्या होत्या. (Tajya Batmya)

राज्यात दूध दर वाढीसाठी विरोधक राज्य सरकार विरोधात आंदोलन करत आहे. मात्र संगमनेरमध्ये (Congress) काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या अधिपत्याखालील सहकारी दूध संघ आहे. भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली दूध उत्पादक शेतकरी आणि कार्यकर्त्यांनी संगमनेर प्रांताधिकारी कार्यालयासमोर खाजगी आणि सहकारी दुध संघाविरोधात घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले. सरकारने दुधाला ३४ रूपये दर जाहीर केला असताना दूध संघांनी शेतकऱ्यांची दिशाभूल करून महायुती सरकारची बदनामी थांबवावी; अशी मागणी यावेळी करण्यात आली. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आता गेटवरच आंदोलन 

माजी महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या शहरात भाजप कार्यकर्ते आज आक्रमक झाले होते. या आंदोलनात किर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्या‌ सासूबाई आणि निळवंडे गावच्या सरपंच शशिकला पवार या देखील सहभागी झाल्या होत्या. आगामी काळात संगमनेरमधील दूध संघाच्या गेटवर आंदोलन करण्याचा इशारा भाजप कार्यकर्त्यांनी अप्रत्यक्षपणे बाळासाहेब थोरात यांनी दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shaktipeeth Expressway :'शक्तीपीठ' ठरणार पांढराहत्ती? शेतकऱ्यांचं नुकसान, शेकडो गावांना फटका बसणार; राजू शेट्टींनी सांगितले विकासाचे अडथळे

Satara News: थरारक! साताऱ्यातील खंबाटकी घाटात ट्रकचा जळून कोळसा; वाहतूक ठप्प, VIDEO

IMD Rain Alert : महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ, मराठवाडासह देशभरात ७ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Hindi Language Controversy: मला मराठी येत नाही, ताकद असेल तर महाराष्ट्रातून हाकलून द्या; केडियानंतर राज ठाकरेंना अभिनेत्याचं ओपन चॅलेंज

Maharashtra Politics : राज ठाकरे संपूर्ण भाषणात कुठेही 'ते' वाक्य बोलले नाही; एकनाथ शिंदेंच्या बड्या नेत्याचा थेट मुद्द्याला हात

SCROLL FOR NEXT