Crime news Saam tv
महाराष्ट्र

धक्कादायक! न्यायालय परिसरातच तरुणाने स्वत:ला पेटवून घेतलं

Ahmadnagar Latest News : आज सकाळी जिल्हा न्यायलयाचे दैनिक कामकाज सुरू झाले होते. त्यावेळी ही घटना घडली.

सचिन अग्रवाल, साम टीव्ही अहमदनगर

अहमदनगर : अहमदनगर (Ahmadnagar) जिल्हा न्यायालय परिसरात एक भयंकर घटना घडली आहे. एका तरुणाने जिल्हा न्यायालयाच्या आवारात स्वतः ला पेटून घेतलं आहे. ऋषिकेश विठ्ठल ढवण राहणार बाभुळगाव ता. राहुरी असे त्या तरुणाचे नाव आहे. त्याला पुढील उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान त्याने स्वतःला का पेटून घेतले याची माहिती समोर आली नाही. (Ahmadnagar Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी जिल्हा न्यायालयाचे दैनिक कामकाज सुरू झाले होते. त्यावेळी ही घटना घडली. ऋषिकेश हा बुधवारी सकाळी (18 मे) जिल्हा न्यायालयात आला होता. यावेळी त्याने स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून घेत पेटून घेतले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे न्यायालय परिसरात एकच खळबळ उडाली.

दरम्यान, परिसरात तैनात असलेल्या पोलिसांनी ऋषिकेश याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. सध्या जिल्हा शासकीय रुग्णालयात त्याचावर उपचार सुरू आहे. माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला असून मला खोट्या प्रकरणात गुंतवलं असल्याचं या तरुणाचं म्हणणे आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आमदार सदाभाऊ खोत रस्त्यावर, ढोलवादन करत लेझीम खेळून डीजे बंदीची मागणी

Gram Panchayat: ग्रामीण राजकारणात बदल! मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सरपंचांचे अधिकार संपले?

विधानसभेत अभूतपूर्व गदारोळ! केसीआर यांच्या मुलासह २२ आमदारांचे निलंबन, राजकीय वर्तुळात खळबळ

Myopia in children: मोबाईल-टॅबलेटच्या अतिवापरामुळे मुलांच्या डोळ्यांवर गंभीर परिणाम? पालकांनी ‘ही’ लक्षणं अजिबात दुर्लक्ष करू नयेत

Employee Bonus : २१,००० पर्यंत पगार असणाऱ्या नोकरदारांसाठी आनंदाची बातमी; बोनसच्या नियमात मोठा बदल, पाहा सविस्तर माहिती

SCROLL FOR NEXT