ahilyanagar Saam
महाराष्ट्र

Ahilyanagar News: पावसाने रस्त्यावर चिखल, आदिवासी महिलेला प्रसुतीच्या कळा; उघड्यावर दिलं बाळाला जन्म

Tribal Woman Gives Birth on Jungle: गावात जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे एका आदिवासी गर्भवती महिलेची जंगलातच उघड्यावर प्रसूती करण्यात आली.

Bhagyashree Kamble

गावात पोहोचायला रस्ता नसल्यामु‌ळे एका आदिवासी महिलेची प्रसुती जंगलातच करावी लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना अहिल्यानगर जिल्ह्यातील जांभळे गावच्या शिवारात घडली असून, स्थानिकांच्या मदतीने महिला आणि बाळाला आरोग्य केंद्रात पोहचवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

प्रतीक्षा दशरथ मधे असे महिलेचं नाव आहे. या अकोले तालुक्यातील जांभळे गावाच्या ठाकरवाडीतील रहिवासी आहेत. गर्भवती महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्यानंतर तिच्या पतीने स्थानिक मुख्याध्यापक राजेंद्र गवांदे यांच्याशी संपर्क साधला. गवांदे यांनी चारचाकी वाहन घेऊन ठाकरवाडीकडे जाण्याचा प्रयत्न केला, परंतु वाडीपर्यंत जाणारा रस्ता चिखलमय झाल्यामुळे वाहन वेळेवर पोहोचू शकले नाही. त्यामुळे प्रतीक्षा यांना पायी चालत आणत असताना रस्त्यातच प्रसूती झाली.

यानंतर, मुख्याध्यापक गवांदे यांच्या मदतीने तिला मुख्य रस्त्यापर्यंत नेण्यात आले आणि तेथून ॲम्ब्युलन्सद्वारे ब्राह्मणवाडा आरोग्य केंद्रात पोहोचविण्यात आले. सुदैवाने, बाळ आणि बाळंतीण दोघेही सुखरूप आहेत.

या घटनेनंतर ठाकरवाडीच्या रस्त्याच्या दयनीय स्थितीवर पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले आहे. स्थानिकांनी अनेक वेळा रस्ता बांधकामासाठी प्रयत्न केले, परंतु अपुऱ्या निधीमुळे काम पूर्ण होऊ शकले नाही.

या भागातील लोकांना अजूनही जंगलातील पायवाटेने प्रवास करावा लागतो, ज्यामुळे पावसाळ्यात आणि आपत्कालीन परिस्थितीत मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो . या घटनेनंतर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Traffic: पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! शहरातील प्रमुख रस्त्यावरील वाहतुकीत मोठे बदल, पर्यायी मार्ग कोणते?

Daily Habits: तुम्हीही नकळत करताय या चुका? शरीरावर होऊ शकतो गंभीर परिणाम, आजच बदला सवयी

Maharashtra News Live Update: पालघरमध्ये विराज प्रोफाइल कंपनीविरोधात आदिवासींचं बेमुदत धरणे आंदोलन; प्रकल्प रद्द करण्याची मागणी

SBI Data Leak : SBI च्या खातेधारकांना मोठा धक्का, नाव, नंबर अन् पत्ता... ग्राहकांची संपूर्ण माहिती डार्क वेबवर लीक

Car Accident: काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याच्या कारचा चक्काचूर; मुंबई-नागपूर हायवेवर भरधाव ट्रकची धडक, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT