Shirdi Sai Baba Saam tv
महाराष्ट्र

Shirdi Sai Baba : शिर्डीला दर्शन घ्यायला जाताय? VIP दर्शन महागलं, आता किती रूपयांना मिळणार पास?

Shirdi Sai Baba, VIP Darshan Price : शिर्डी साईबाबा संस्थानाने व्हीआयपी (ब्रेक) दर्शनाच्या शुल्कात ₹१०० ची वाढ केली आहे. आता प्रोटोकॉल दर्शन पाससाठी भाविकांना ₹३०० मोजावे लागणार आहेत.

Namdeo Kumbhar

सचिन बनसोडे | शिर्डी प्रतिनिधी | साम टीव्ही मराठी

Shirdi Sai Baba VIP Darshan fee increased : अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी साईंच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना आता व्हिआयपी दर्शनासाठी १०० रूपये जास्त मोजावे लागणार आहेत. साईबाबा संस्थानाकडून याबाबतचा निर्णय जाहीर करण्यात आला. आता यापुढे VIP दर्शन शुल्कात १०० रूपयांची वाढ करण्यात आली आहे. प्रोटोकॉल दर्शन पाससाठी प्रतिव्यक्ती २०० रूपयाऐवजी आता ३०० रुपये मोजावे लागणार आहे.

शिर्डीत व्हीआयपी ब्रेक दर्शनाचा पास आजपासून महागला आहे. २०० रुपयांत मिळणारा व्हीआयपी पास आता भाविकांसाठी ३०० रुपयांना मिळणार आहे. देश-विदेशातून येणारे हजारो भाविक झटपट दर्शनासाठी सशुल्क पासद्वारे दर्शन घेतात. शिफारस केलेल्या भाविकांना अगदी जवळच्या ३ नंबर गेटमधून साई संस्थानच्या प्रोटोकॉलसह, तर इतर सशुल्क पास धारकांना ६ नंबर गेटमधून समाधी मंदिरात सोडले जाते. मात्र आता शिफारसदार भाविकास VIP दर्शनासाठी १०० रुपये अधिक मोजावे लागणार आहेत.

साईबाबांच्या दर्शनासाठी साईबाबा संस्थानकडून गेल्या अनेक वर्षांपासून सशुल्क पास दर्शन सुविधा सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर मागील वर्षापासून ब्रेक दर्शन व्यवस्था सुरू करण्यात आली आहे. या व्यवस्थेनुसार व्हीआयपी किंवा शिफारस पत्र असलेल्या भाविकांना ठराविक वेळेत विशेष दर्शनाची सुविधा दिली जाते. सकाळी 9 ते 10, दुपारी 2.30 ते 3.30 आणि रात्री 8 ते 8.30 या वेळेत ब्रेक दर्शन दिले जाते. आतापर्यंत या सेवेसाठी प्रति व्यक्ती 200 रुपये आकारले जात होते.. मात्र आता ब्रेक दर्शन घेणा-या भाविकांसाठी हा दर वाढवून 300 रुपये करण्यात आला आहे. सामान्य भाविकांसाठी असलेल्या सशुल्क पासच्या दरामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

माजी मुख्यमंत्र्यांना पुन्हा मोठा धक्का! 3 माजी खासदारांचा भाजपमध्ये प्रवेश; राजकीय वर्तुळात खळबळ

Khekda Bhaji Recipe : गरमागरम चहा अन् कुरकुरीत खेकडा भजी, मुसळधार पावसात करा चटपटीत नाश्ता

Maharashtra News Live Update: येवला-मनमाड रोडवर टू व्हीलरला वाचविण्याच्या प्रयत्नात क्रूजर गाडी गेली खड्ड्यात

नाशिक रिंगरोडची अलाईनमेंट बदलली? IAS अधिकाऱ्यांची होणार चौकशी, खळबळजनक आरोपानंतर राज्य सरकारचा निर्णय

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींच्या खात्यावर पुढच्या आठवड्यात ₹१५०० येणार, महत्त्वाची अपडेट आली समोर

SCROLL FOR NEXT