Villagers of Saundala celebrating their historic resolution to abolish caste identity and promote social equality Saam Tv
महाराष्ट्र

अहिल्यानगरमधील सौंदाळा 'जातमुक्त', आमच्या गावानं जात सोडली

Caste Free Village In Maharashtra: महाराष्ट्रात जातीय अस्मिता तीव्र होत असताना एका गावानं मात्र थेट जातीच्या भिंतीच उद्ध्वस्त केल्या आहेत....या गावानं जातीलाच तिलांजली दिलीय...कोणतं आहे हे गाव? या गावातल्या गावकऱ्यांनी जात का सोडली?

Suprim Maskar

"जात नाही ती जात" असं आपल्याकडे उपरोधाने म्हटलं जातं. पण अहिल्यानगर जिल्ह्यातील एका छोट्याशा गावाने या म्हणीला कायमची मूठमाती दिलीय..नेवासा तालुक्यातील सौंदाळा गावाने 'जातमुक्ती'चा ऐतिहासिक निर्णय घेत संपूर्ण देशासमोर एक नवा आदर्श ठेवलाय..काय आहे हा सौंदाळा पॅटर्न आणि गावकऱ्यांनी नक्की कोणता विडा उचललाय?

सौंदाळा गावाचा 'क्रांतीकारी' ठराव

ग्रामसभेत 'जातमुक्त गाव' करण्याचा ठराव मांडण्यात आला

जात, धर्म, पंथ किंवा वंशाच्या आधारावर गावात कोणताही भेदभाव नको

आंतरजातीय विवाह मोठ्या थाटात लावले जातील, त्याला पूर्ण सामाजिक पाठिंबा असेल

जातीवाद पसरवणारे मेसेज करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईची तरतूद

'माझी जात - मानव' हाच मंत्र आता प्रत्येक ग्रामस्थानं स्वीकारला

खरतर सौंदाळा गाव हे काही पहिल्यांदाच चर्चेत आलेले नाही. यापूर्वीही या गावाने शिवी बंदी, विधवा पुनर्विवाह आणि विद्यार्थी हिताचे अनेक पुरोगामी निर्णय घेतले आहेत. आता सार्वजनिक ठिकाणे, सण-उत्सव, शासकीय योजना आणि सामाजिक कार्यक्रमातून जातिभेद पूर्णपणे हद्दपार करण्याचा ऐतिहासिक निर्णय या गावानं घेतलाय.. त्यामुळे जात निर्मूलनासाठी केवळ भाषणं देण्याच्या या काळात सौंदाळा गावानं जातमुक्तीसाठी प्रत्यक्ष कृती केलीय..केवळ कायदा करून समाज बदलत नाही, तर त्यासाठी मनाची तयारी लागते, हेच या गावकऱ्यांनी सिद्ध केलंय. त्यामुळे सौंदाळा गावाने टाकलेले पाऊल महाराष्ट्रातील इतर गावांनाही प्रेरणा देणारं ठरेल, यात शंका नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: रायगडमध्ये पावसाळी पर्यटनासाठी धबधब्यांवर गर्दी

CJP नंतर आता E20 जनता पार्टीची एंट्री; 100% पेट्रोलसाठी सोशल मीडियावर मोहीम

Water Intake: दिवसभर पाणी पिता पण, पाणी पिण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहित आहे का? ९०% लोक करतात ही मोठी चूक

राजकारणात लय भष्ट्राचार झालाय! माजी मुख्यमंत्र्यानं घेतला मोठा निर्णय

Chinmayee Salvi: गुलाबी साडी, रेट्रो स्टाईल अन् मोहक अदा; 'सनई चौघडे' फेम चिन्मयी साळवी

SCROLL FOR NEXT