Rahata Murder News  Saam tv
महाराष्ट्र

Crime : थोरल्याशी वाद, धाकट्याचा खून! ६ जणांनी अपहरण केलं अन् तरूणाचा जीव घेतला, अहिल्यानगर हादरले

Rahata Murder News : अहिल्यानगर राहता येथे थोरल्या भावासोबतच्या वादातून १९ वर्षीय प्रतीक सदाफळ याचे अपहरण करून निर्घृण हत्या. सिन्नर-शिर्डी महामार्गाजवळ मृतदेह आढळून आला.

Namdeo Kumbhar

Ahilya nagar Rahata News : थोरल्या भावासोबतच्या वादामुळे धाकट्या भावाचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना अहिल्या नगरमधील राहता येथे घडली आहे. एका तरूणासोबत असलेल्या पूर्ववैमनस्यातून ६ जणांनी त्याच्या १९ वर्षीय भावाचे अपहरण केले. त्याला लोखंडी रॉडने सपासप मारत खून केला. त्यानंतर मृतदेह सिन्नर-शिर्डी महामार्गावर सामाजिक वनीकरणाजवळ रस्त्याच्या कडेला फेकला. प्रतीक वसंत सदाफळ असे मृत तरूणाचे नाव आहे. सिन्नर पोलिसांत याप्रकरणी संशयितांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास प्रतीकचे अपहरण झाले. गणेश नगर येथील निर्मळ हॉस्पिटलसमोरून संशयितांनी सिल्व्हर रंगाच्या कारमधून त्याचं अपहरण केले. संशियतांनी प्रतीक याला लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली, त्यामध्ये त्याचा जीव गेला. खून लपवण्यासाठी मृतदेह सिन्नर तालुक्यातील मुसळगाव शिवारात वनीकरण परिसरात नाल्याजवळ फेकून दिला. सोमवारी सकाळी शेळ्या चारणाऱ्या व्यक्तीला रस्त्याकडेला मृतदेह दिसल्याने गावच्या पोलिस पाटलांना कळवले. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला.

या प्रकरणी मयत प्रतीकचा मोठा भाऊ रितेश सदाफळ याने एमआयडीसी पोलिस स्टेशनमध्ये भावाचा खून झाल्याची फिर्याद नोंदवली. रितेशच्या फिर्यादीनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. रितेशने दिलेल्या फिर्यादीनुसार, रितेश आणि संशयित आरोपींमध्ये आधीपासून वैमनस्य होते. आरोपींना रितेशला जाळ्यात ओढायचे होते. पण तो फसला नाही. त्याच रागातून संशयितांनी प्रतीकवर हल्ला केला. पोलिसांनी प्रशांत जाधव, अक्षय पगारे, चंदू तहकीत, ओमकार रोहम, प्रवीण वाघमारे आणि सोनू पवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips : दातांमध्ये गॅपमुळे मनमोकळे हसता येईना! हसताना लाज वाटतेय? या उपाय खुलवतील तुमचं हास्य

चिमुकल्यांच्या पोषण आहाराचा पर्दाफाश; सेविकेवर कारवाई, आता प्रशासनाने घेतला मोठा निर्णय!

पाण्याचा प्रश्न सुटणार? 140 एकरांसाठी ब्रिजस्टोन इंडियाची मोठी घोषणा! नेमका काय आहे प्रोजेक्ट?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

Sambhajinagar: आत्महत्या करणाऱ्या तरुणाला वाचवायला गेले, डोंगरावरून पडून आई-वडील अन् मुलाचा मृत्यू; संभाजीनगर हादरले

SCROLL FOR NEXT