Ahilyanagar News Saam Tv
महाराष्ट्र

Shocking : नगरमध्ये खळबळजनक घटना, ९ वीच्या मुलीला ‘तलब जिहाद’मध्ये अडकवण्याचा प्रयत्न, महिला शिक्षिकेचा प्रताप उघड

Ahilyanagar School Teacher News : अहिल्यानगरमध्ये खाजगी शाळेत विद्यार्थिनीला दिशाभूल केल्याचा गंभीर आरोप. पालकांनी पोलिसांकडे पुरावे सादर केले असून तपास सुरू आहे. आमदारांनीही कठोर कारवाईची मागणी केली.

Alisha Khedekar

  • शाळेतील शिक्षिकेने विद्यार्थिनीला धर्मांतराबाबत शिकवले

  • पालकांच्या तक्रारीनंतर शिक्षिकेवर गुन्हा दाखल

  • सोशल मीडिया संपर्काचे पुरावे सादर

  • जनप्रतिनिधींचा तपासात सहभाग; कठोर कारवाईची मागणी

अहिल्यानगरमधून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहरातील एका खाजगी शाळेत ९ वी मध्ये शिकणाऱ्या १३ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला त्या शाळेतील एका महिला शिक्षकेने जादू टोण्यासारखा प्रकार करून तलब जिहाद मध्ये अडकवण्याचा प्रकार केला आहे. या घटनेमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नववी मध्ये शिकणाऱ्या एका मुलीला महिला शिक्षिकेने काही दिवस विश्वासात घेऊन इस्लाम धर्माविषयी सांगितलं. तिला याबद्दल माहिती घेण्यासाठी इंस्टाग्राम आयडी उघडून दिले, तसेच काही तरुणांशी ओळख करून दिली आणि त्या मुलीला इस्लाम धर्म शिकण्यासाठी प्रवृत्त केले होते. तसंच घरच्यांपासून संरक्षणासाठी काही वस्तूही तिला महिला शिक्षिकांनी दिल्या होत्या.

हा प्रकार पालकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी याप्रकरणी सखोल माहिती घेतली. त्यानंतर अनेक धक्कादायक प्रकार उघडकीस आले आहेत. अखेर पालकांनी घाबरून आपल्या मुलीला शाळेत पाठवणे बंद केले. याप्रकरणी त्या महिला शिक्षिकेबरोबर तिला मदत करणाऱ्या तरुणांवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी विद्यार्थ्यांच्या पालकांसह, नगर शहराचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची भेट केली आहे.

तसेच पोलिसांना याप्रकरणी अनेक पुरावे पालकांनी सादर केले आहेत. हा प्रकार अत्यंत धक्कादायक असून शाळेमध्ये शिकणारे मुलं हे निरागस असतात. मात्र बालवयात असे प्रकार झाल्यामुळे त्यांच्यामध्ये बदल घडू शकतो. त्यामुळे शाळेत असे प्रकार रोखण्यासाठी अशा शिक्षकांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आमदार संग्राम जगताप यांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan : कल्याणमध्ये कायदा सुव्यवस्था धाब्यावर; नशखोरांची घरात घुसून दुकानदार दाम्पत्याला मारहाण

Maharashtra Live News Update : पनवेलजवळ मालगाडी रुळावरून घसरली; रेल्वे वाहतूक काही काळ विस्कळीत

कल्याण-डोंबिवलीकरांनो सावध राहा; ग्रामीण पट्ट्यात बिबट्याची एन्ट्री, नागरिक दहशतीत

राज्यातील सर्व शाळा उद्या बंद; पुण्यात उद्या शिक्षक शिक्षकेतर संघटनेचा एल्गार

रॉकस्टार सूनबाई! डोक्यावर पदर हाती गिटार, व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमधील नवरी आहे तरी कोण?

SCROLL FOR NEXT