Bull Attack Saam tv
महाराष्ट्र

Bull Attack : दुचाकींचा पाठलाग करत मोकाट बैलाचा हल्ला; हल्ल्यात लहान मुलगा जखमी, घटना सीसीटीव्हीत कैद

Ahilyanagar News : गाडीवर लहान मुलांना घेऊन जात असताना रस्त्यावर उभ्या असलेल्या बैलाने दुचाकीचा पाठलाग करत हल्ला चढवला. या हल्ल्यात त्या व्यक्तीसह त्याच्यासोबत असलेल्या चिमुकल्यालाही बैलाने लक्ष्य केले

Rajesh Sonwane

सुशील थोरात 

अहिल्यानगर : रायगड जिल्ह्याच्या कर्जत येथे काल पिसाळलेल्या बैलाच्या हल्ल्यात एका जणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सदरची घटना ताजी असतानाच अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी शहरात तशीच घटना होता होता वाचली आहे. मात्र या घटनेत एक लहान मुलगा बचावला असून तो जखमी झाला आहे. दरम्यान बैलाच्या हल्ल्याचा CCTV व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

रस्त्यावरील मोकाट जनावरे आणि कुत्र्यांचा प्रश्न सातत्याने समोर येत आहे. कुत्रे आणि मोकाट जनावरांकडून रस्त्यावरून जाणाऱ्यावर हल्ले केले जात असल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. दरम्यान कर्जत येथे काल बैलाने केलेल्या हल्ल्यात एका जणाचा मृत्यू झाला आहे. यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यात मोकाट बैलाकडून दुचाकीवर हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. 

दुचाकीचा पाठलाग करत हल्ला 
अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी शहरातील साईनाथ नगर भागात सुमित कळसकर ही व्यक्ती आपल्या गाडीवर लहान मुलांना घेऊन जात होते. यावेळी रस्त्यावर उभ्या असलेल्या एका बैलाने त्यांच्या दुचाकीचा पाठलाग करत अचानक त्यांच्यावर हल्ला चढवला. या हल्ल्यात त्या व्यक्तीसह त्याच्यासोबत असलेल्या चिमुकल्यालाही बैलाने लक्ष्य केले. मात्र, तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी वेळीच मध्यस्थी करत बैलाला हाकलून लावले.  

नजीकच्या घरात घुसल्याने बचावले 

तर कळसकर हे दोन्ही मुलांना घेऊन जवळच असलेल्या घरात घुसल्याने बचावले आहेत. मात्र बैलाच्या या हल्ल्यात छोट्या मुलाला दुखापत झाली असून त्याच्या डोक्याला मार लागला आहे. अलीकडे बैल व मोकाट जनावरांच्या नागरिकांवर हल्ल्याच्या घटना वाढताना दिसत आहेत. त्यामुळे शहर व गावांमधील रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्या जनावरांना पकडून त्यांची योग्य ती व्यवस्था करण्याची मागणी आता संबंधित प्रशासनाकडे जोर धरत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Health Care: पावसाळ्यात रोज सकाळी नाश्त्यासोबत दूध प्या मिळतील हे ७ आरोग्यदायी फायदे

Raigad : मुसळधार पावसाचा कहर! वाकण-पाली-खोपोली राज्य महामार्गावरील वाहतूक ठप्प; नागरिकांचे हाल

Aamir khan wedding : आमिर खान तिसऱ्यांदा चढला बोहल्यावर; गौरी स्प्रॅटसोबत बांधली लग्नगाठ, पहिला PHOTO आला समोर

Tricks To Protect Mobile : पावसाळ्यात मोबाईल भिजण्यापासून वाचवण्यासाठी फॉलो करा या ट्रिक्स

Maharashtra News Live Update: रत्नागिरी- रत्नागिरीकरांच विमानाचं स्वप्न आता लवकरच पुर्ण होणार

SCROLL FOR NEXT