Rohit Pawar Saam tv
महाराष्ट्र

Rohit Pawar : महायुतीकडे खूप पैसा, तो हेलिकॉप्टरनेही पोहचवतील; विनोद तावडे प्रकरणावर रोहित पवारांची प्रतिक्रिया

Ahilyanagar News : विनोद तावडे यांच्याकडे पैसे सापडलेल्या प्रकरणावर कर्जत- जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली

Rajesh Sonwane

सुशील थोरात 

अहिल्यानगर :  महायुतीकडे पैसा खूप मोठ्या प्रमाणात आहे. हा पैसा गाडीने पोहोचला जातो. गाडीने जमला नाही तर हेलिकॉप्टरनेही पोहोचवला जातो. एवढा पैसा झाल्यावर करणार काय गोडाऊन सुद्धा कमी पडतील अशी परिस्थिती आहे. जे पैसे खाल्ले आहेत, त्यातील पैसे खर्च करण्यात काय हरकत आहे अशी त्यांची मानसिकता आहे; अशी प्रतिक्रिया आमदार रोहित पवार यांनी दिली. 

भाजप (BJP) राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे हे पैसे वाटत असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीकडून करण्यात आला होता. विनोद तावडे यांच्याकडे पैसे सापडलेल्या प्रकरणावर कर्जत- जामखेडचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली. आमदार पवार यांनी विनोद तावडेंच्या प्रकरणावर भाजपवर निशाणा साधला आहे.

मतांचा बाजार झालाय 

अत्यंत चुकीच्या पद्धतीने ही निवडणूक सुरू असून लोकांच्या स्वाभिमानाचा, लोकांच्या मताचा बाजार झाला आहे. लोकांचा मत विश्वासात घेतलं जात नाही. लोकांचा स्वाभिमान विकत घेतला जात आहे; अशी चर्चा आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत ही अतिशय चिंताजनक बाब असल्याचं आमदार रोहित पवार म्हणाले. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kidney Stone: कोणत्या भाज्या कच्च्या खाऊ नयेत? किडनी स्टोनचा धोका टाळण्यासाठी उपाय

Mumbai : लिंक रोड,टनेल रोड ते कोस्टल रोड, मुंबईचा कायापालट होणार ; मेट्रोच्या बड्या अधिकाऱ्यानं सांगितला रोड मॅप

Bigg Boss 19: 'बिग बॉस'च्या घरात राडा, मालतीने फरहानाला लाथ मारली अन् टेबल..., पाहा VIDEO

Processed Food Side Effect: जास्त प्रोसेस्ड फूड खाल्ल्याने होतात 'हे' नुकसान, आजपासूनच घ्या काळजी

Maharashtra Live News Update: एकाच व्यासपीठावर दोन पिक्चर, भाजप आणि शिवसेनेची एकाच मंचावर सभा

SCROLL FOR NEXT