Nylon Manja Saam tv
महाराष्ट्र

Nylon Manja : बंदी असतानाही नायलॉन मांजा विक्री; अहिल्यानगर जिल्ह्यात १८ गुन्हे दाखल

Ahilyanagar News : गुजरातप्रमाणे महाराष्ट्रात देखील पतंग उत्सव साजरा केला जात असतो. यासाठी नायलॉन मांजाचा वापर केला जातो मांजामुळे दरवर्षी अनेक दुर्घटना घडत असतात पशु-पक्षांसह माणसाला धोका निर्माण होतो

Rajesh Sonwane

सुशील थोरात 

अहिल्यानगर : मकरसंक्रांती निमित्ताने अनेकजण पतंग उडविण्याचा आनंद घेत असतात. मात्र पतंग उडविण्यासाठी वापरला जात असलेला नायलॉन मांजा हा धोकेदायक ठरत असतो. यावर बंदी घालण्यात आली असताना देखील त्याचा वापर केला जात आहे. यामुळे विक्री करणारे व वापर करणाऱ्यांवर कारवाई केली जात असते. त्यानुसार अहिल्यानगर जिल्ह्यात १८ जणांवर गुन्हे दाखल करत मांजा जप्त करण्यात आला आहे.

गुजरातप्रमाणे महाराष्ट्रात देखील पतंग उत्सव साजरा केला जात असतो. मात्र यासाठी नायलॉन मांजाचा वापर केला जात असतो. या मांजामुळे दरवर्षी अनेक दुर्घटना घडत असतात. पशु-पक्षांसह माणसाला देखील या नायलॉन माजांपासून धोका निर्माण होतो. यामुळे हा मांजा वापर व विक्री करण्यावर बंदी करण्यात आली आहे. असे असले तरी मांजाची छुप्या पद्धतीने विक्री आणि वापर करण्यात येत असतो. अशांविरोधात पोलीस प्रशासनाकडून कारवाई करण्यात येत असते. 

पावणेचार लाखाचा मांजा जप्त 

मकरसंक्रांत सणानिमित्त तरुण- तरुणी मोठ्या उत्साहात पतंग महोत्सव साजरा करतात. हे चित्र अहिल्यानगर जिल्ह्यात पाहण्यास मिळत आहे. त्या अनुषंगाने अहिल्यानगर जिल्ह्यात पोलीस प्रशासन आणि मनपाकडून कारवाई केली जात आहे. या दरम्यान अहिल्यानगर जिल्ह्यात मागील पंधरा दिवसात विक्री करणाऱ्या १८ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून ३ लाख ७८ हजार रुपयांचा नायलॉन मांजा जप्त करण्यात आला आहे.

पतंग विक्रेत्यांना महापालिकेकडून नोटीस 

विशेष म्हणजे एकट्या अहिल्यानगर शहरात ८ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे. तर अहिल्यानगर मनपाने देखील सर्व पतंग विक्रेत्यांना नोटिसा बजावून नायलॉन मांजा विक्री करू नये; अन्यथा कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला. तर सामाजिक संघटनांकडूनही पतंग विक्रेत्यांचे प्रबोधन केले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मंत्रिमंडळ बदलाच्या हालचाली?

राजकीय वर्तुळात मोठी खळबळ! दोन्ही राष्ट्रवादीची अचानक बैठक, कोअर कमिटीनं घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, नेमकं कारण काय?

Cabinet Reshuffle : राज्यातील ५ मंत्री बदलणार? राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या फेरबदलांच्या हालचाली, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Kojagiri Purnima 2026: कोजागिरी पौर्णिमेला लक्ष्मीच्या कृपेसाठी चुकवू नका ‘या’ गोष्टी

Soan Papdi Recipe: यंदा दिवाळीत घरी बनवा हलकी, खुसखुशीत आणि तोंडात विरघळणारी सोनपापडी, वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT