Ahilyanagar  Saam tv
महाराष्ट्र

Ahilyanagar : रुग्णालयाचे लॉगिन वापरून काढले बनावट दिव्यांग प्रमाणपत्र; दोन जणांना अटक

Ahilyanagar news : अहिल्यानगरच्या जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना हाताशी धरून कोणतीही वैद्यकीय तपासणी न करता तसेच रुग्णालयात नोंद न करता ऑनलाईन पोर्टलवर परस्पर माहिती भरली

Rajesh Sonwane

सुशील थोरात 
अहिल्यानगर
: जिल्हा रुग्णालयाच्या पोर्टलवर जात परस्पर माहिती भरून अपंगत्वाचे प्रमाणपत्र काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार अहिल्यानगरमध्ये समोर आला होता. या प्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर सदर बनावट प्रमाणपत्र प्रकरणी दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.   

अहिल्यानगरमध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आला होता. यात अहिल्यानगरच्या जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना हाताशी धरून कोणतीही वैद्यकीय तपासणी न करता तसेच रुग्णालयात नोंद न करता ऑनलाईन पोर्टलवर परस्पर माहिती भरली. यानंतर त्या माहितीच्या आधारे कर्णबधीर असल्याचे बनावट अपंग प्रमाणपत्र मिळवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. याबाबत जिल्हा रुग्णालय प्रशासनाने गंभीर दखल घेतली होती. 

सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल 

बनावट प्रमाणपत्र प्रकास्नी जिल्हा रुग्णालय प्रशासनाचे डॉ. साहेबराव डवरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून प्रसाद संजय बडे, सुदर्शन शंकर बडे, सागर भानुदास केकाण, गणेश रघुनाथ पाखरे यांच्यासह जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी योगेश बनकर आणि गणेश गोत्राळ या सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यापैकी योगेश बनकर याचा मृत्यू झाला आहे. 

दोघांना घेतले ताब्यात 

तसेच सदर प्रकरणातील प्रसाद बडे, गणेश रघुनाथ पाखरे, गणेश गोत्राळ या तीघांनी अटकपूर्व जामीन घेतला आहे. मात्र तोफखाना पोलिसांनी या प्रकरणात सागर भानुदास केकान आणि सुदर्शन बडे या दोघांना अटक केली आहे. या दोघांकडून तपासामध्ये आणखी काही धागेदोरे मिळण्याची शक्यता असल्याची तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nail Care Tips : फक्त ५ मिनिटांचा उपाय! अ‍ॅलोवेरामुळे नखे होतील मजबूत

केस लवकर वाढवण्यासाठी सकाळी की रात्री तेल कधी लावावे? योग्य वेळ काय?

Maharashtra News Live Update: पुण्यात भर पावसात काँग्रेसचं आंदोलन

Ladki Bahin Yojana : रक्षाबंधनाआधी लाडक्या बहिणींना मोठा धक्का! ₹1,500 अचानक बंद? सरकारकडून स्पष्टीकरण

High Blood Pressure : हाय बीपीच्या रुग्णांसाठी कोणती भाजी, फळ अन् पीठ सुपरहेल्दी?

SCROLL FOR NEXT