Ahilyanagar news Saam tv
महाराष्ट्र

Ahilyanagar News : जम्मू- काश्मीरमधील ९ जण ताब्यात; बनावट बंदूक परवाना घेत करायचे सुरक्षा रक्षकाची नोकरी

Ahilyanagar News : सुरक्षारक्षक म्हणून नोकरीसाठी बनावट बंदूक परवाना घेऊन नोकरी मिळवणाऱ्या जम्मू कश्मीर येथील ९ जणांना मिलिटरी इंटेलिजन्स आणि तोफखाना पोलिसांनीं अटक केली

Rajesh Sonwane

सुशील थोरात 

अहिल्यानगर : अहिल्यानगरमध्ये बनावट बंदूक परवाना घेऊन सुरक्षा रक्षकाची नोकरी करणाऱ्या जम्मू काश्मीरमधील ९ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून १२ बोअर, ९ रायफल आणि ५८ काडतूस जप्त केले आहेत. सदरची कारवाई मिलिटरी इंटेलिजन्स आणि तोफखाना पोलिसांनी केली आहे. 

सुरक्षारक्षक म्हणून नोकरीसाठी बनावट बंदूक परवाना घेऊन नोकरी मिळवणाऱ्या जम्मू कश्मीर येथील ९ जणांना मिलिटरी इंटेलिजन्स आणि तोफखाना (Police) पोलिसांनीं अटक केली आहे. त्यांच्याकडून १२ बोअर, ९ रायफल आणि ५८ काडतूसे जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी जम्मू काश्मीर येथील राजौरी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून बंदूक परवण्याची माहिती मागविण्यात आली. मात्र हे शस्त्र परवाने बनावट असल्याचे त्यांनी कळवताच पोलिसांनी ९ जणांना अटक केली आहे. यामधील सर्व जण हे (Jammu And Kashmir) जम्मू काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले आहे. 

जम्मू काश्मीरमधील हे ९ जण नगर जिल्ह्यात खोट्या कागदपत्राच्या आधारे सुरक्षारक्षक म्हणून काम करत असल्याची माहिती मिलिटरी इंटेलिजन्स यांना मिळाली होती. त्यानुसार तोफखाना पोलीस यांच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात आर्म एक्टसह गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोस्टाच्या पार्सलद्वारे मागविलेली तलवार जप्त
जालना
: पोस्टाच्या पार्सल द्वारे जालना शहरामध्ये मागविलेली तलवार पोलिसांनी जप्त केली. जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. जालना शहरातील वाल्मीकनगर येथे राहणाऱ्या आदित्य संजय चंडालिया याने एक धारधार तलवार पोस्टाद्वारे मागवली असल्याची गुप्त माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. पोस्टाद्वारे मागवलेल्या तलवारीची आज डिलीव्हरी होणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला प्राप्त झाली. त्या माहितीवरून गुन्हे शाखेच्या पथकाने जालना शहरातील हेड पोस्ट ऑफीस परिसरात सापळा लाऊन आदित्य चंडालिया यास ताब्यात घेतले. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thackeray: काही तासांत ठाकरेंची तोफ धडाडणार; युतीची घोषणा होणार? आधी अन् शेवटी कोण भाषण करणार? A टू Z माहिती..

Marathi bhasha Vijay Live Updates : ठाकरेंच्या मेळाव्यासाठी मनसेने छापले खास टीशर्ट, पाहा व्हिडिओ

Salman Khan : रक्तबंबाळ शरीर अन् डोळ्यात आग; सलमानच्या 'बॅटल ऑफ गलवान'चं पोस्टर रिलीज, पाहा VIDEO

Tax Free Income: कामाची बातमी! या १० ठिकाणाहून येणाऱ्या पैशांवर एक रुपयाही टॅक्स नाही; ITR भरण्यापूर्वी या गोष्टी वाचाच

Worli Tourism: वरळीपासून अगदी जवळची आणि खास ठिकाणं, One Day Trip साठी ठरेल बेस्ट

SCROLL FOR NEXT