Srirampur Crime Saam tv
महाराष्ट्र

Shrirampur Crime : चोरी करायला गेला अन् पोलीस आले; इमारतीवरून उडी मारण्याची पोलिसांना धमकी, चोरट्यास घेतले ताब्यात

Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरातील कुंभार गल्ली परिसरात आज सकाळीच चोरांचा थरार पाहायला मिळाला. यात दोन चोरट्यांनी सुधीर लोळगे यांच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील खोली फोडून घराच्या आत प्रवेश केला.

Rajesh Sonwane

सचिन बनसोडे 

श्रीरामपूर (अहिल्यानगर) : रात्रीच्यावेळी चोरी करण्यासाठी चोरट्याने घरात प्रवेश केला. याचवेळी पोलीस आले. पोलीस आल्याचे लक्षात येताच थेट टेरेसवर पोहचला. यानंतर त्याने पोलिसांनाच धमकावण्याचा प्रयत्न केला. अर्थात चोराच्या उलट्या बोंबा असा काहीसा प्रकार अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात बघायला मिळाला आहे. 

अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरातील कुंभार गल्ली परिसरात आज सकाळीच चोरांचा थरार पाहायला मिळाला. यात दोन चोरट्यांनी सुधीर लोळगे यांच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील खोली फोडून घराच्या आत प्रवेश केला. दोघंही चोरटयांनी घरात हात साफ करत होते. दरम्यान चोर आल्याचे लक्षात आल्याने परिसरातील नागरिकांनी पोलिसांना माहिती देत पाचारण केले. यानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. 

दरम्यान घरात चोरीचा प्रयत्न करत असलेल्या चोरट्याना पोलीस आल्याची चाहूल लागली. यानंतर एक चोरटा पसार तेथून झाला. मात्र दुसऱ्याला पळून जाण्यात अपयश आल्याने दुसऱ्याने थेट इमारतीची गच्ची गाठली. यानंतर त्याने पोलिसांना धमकावण्याचा प्रयत्न केला. यात त्याने गच्चीवरून उडी मारून जीव देण्याची धमकी पोलिसांना दिली. यामुळे घटनास्थळी असलेले पोलीसात खळबळ उडाली होती. 

एक तासाच्या गोंधळानंतर चोरटा ताब्यात 

हा संपूर्ण प्रकार जवळपास एक तास सुरू होता. हा प्रकार परिसरातील काही नागरिकांनी आपल्या मोबाईल कॅमेरात कैद केला. दरम्यान पोलिसांनी मोठ्या शिथापीने त्या चोरट्यास ताब्यात घेऊन त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Accident: जेजुरीत अपघाताचा थरार! पायी जाणाऱ्या वारकऱ्यांना ट्रकने चिरडलं, ४ जणांचा मृत्यू

गरमा गरम चहासोबत खा पोहा कचोरी, घरी बनवण्याची सोपी रेसिपी

Kidney stone symptoms: सतत पाठीच्या दुखण्याकडे दुर्लक्ष करू नका; किडनी स्टोन झाल्यावर शरीर देत असलेली ही 8 लक्षणं ओळखा

Maharashtra News Live Update: कुडाळ तालुक्यातील जांभवडे- खोचरेवाडी पूल खचला

Pune Crime: पुणे हादरले! भररस्त्यात हत्याकांडाचा थरार, डोक्यात दगड घालून तरुणाला जागीच संपवलं

SCROLL FOR NEXT