SON KILLS FATHER IN AHILYANAGAR SHOCKING FAMILY DISPUTE CASE Saam tv
महाराष्ट्र

Crime News : अहिल्यानगर हादरलं! किरकोळ वाद टोकाला गेला, मुलाने वडिलांवर चाकूने वार करत संपवलं

Ahilyanagar Crime News : अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे कौटुंबिक वादातून मुलानेच वडिलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत तपास सुरू केला आहे.

Alisha Khedekar

  • श्रीरामपूरमध्ये मुलाने वडिलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना

  • कौटुंबिक वादातून संतापाच्या भरात हल्ला

  • जखमी वडिलांचा उपचारादरम्यान मृत्यू

  • आरोपी मुलगा पोलिसांच्या ताब्यात, तपास सुरू

सचिन बनसोडे, अहिल्यानगर

वडील मुलाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यात दत्तनगर परिसरात पोटच्या मुलानेच आपल्या जन्मदात्या वडिलांची हत्या केल्याची घटना घडलीआहे. धक्कादायक म्हणजे कौटुंबिक कारणातून ही हत्या करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलाविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु केला आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आशपाक बागवान असे आरोपी मुलाचे नाव असून मुसा हसन बागवान असे मृत व्यक्तीचे नाव आहे. सदर घटना काल रात्री सुमारे साडे अकरा वाजताच्या दरम्यान घडली. आरोपी आशपाक बागवान याने आपल्या वडिलांवर धारदार चाकूने सपासप वार केले. या हल्ल्यात मुसा बागवान गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

प्राथमिक माहितीनुसार, वडील आणि मुलामध्ये काही दिवसांपासून कौटुंबिक वाद सुरू होता. या वादाचे रूपांतर काल रात्री तीव्र भांडणात झाले आणि संतापाच्या भरात आशपाकने वडिलांवर हल्ला केल्याचे सांगितले जात आहे. या घटनेमुळे कुटुंबीयांमध्ये शोककळा पसरली असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच श्रीरामपूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांसोबत फॉरेन्सिक पथकही दाखल झाले असून घटनास्थळाची तपासणी करण्यात आली. पुरावे गोळा करून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, आरोपी आशपाक बागवान याला पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले असून त्याच्याकडून अधिक चौकशी केली जात आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात नेमके कारण काय होते? वादाची पार्श्वभूमी काय होती? याचा सखोल तपास पोलीस करत आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नातेसंबंधांतील तणाव किती टोकाला जाऊ शकतो, याचे हे धक्कादायक उदाहरण मानले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: प्रसाद लाड यांची सुरक्षा वाढवली

मनोज जरांगेंना भेटायला निघाले, प्रसाद लाड यांना जिवे मारण्याची धमकी; २ जणांना बेड्या, नेमकं प्रकरण काय?

निर्लज्जपणाची हद्द पार! परभणीत डिझेलसाठी सातबाऱ्याची अट, पंप चालकाची संतापजनक अट

Mumbai Accident : बीएमसीच्या गाडीची मायलेकराला धडक; यारी रोड परिसरात खळबळ

PF Withdrawal Process: कामाची बातमी! PF चे पैसे झटक्यात काढा, UPI नं थेट बँक खात्यात येणार, फक्त ३ सोप्या स्टेप्स करा फॉलो

SCROLL FOR NEXT