ahilyanagar  Saam
महाराष्ट्र

अहिल्यानगर हादरले! प्रिन्सिपलने ८ वर्षांच्या विद्यार्थ्याचा घेतला चावा; गळा दाबून २० सेकंद हवेत उचलले

Maharashtra school news : अहिल्यानगरमधील खासगी शाळेत ८ वर्षांच्या विद्यार्थ्याचा हात चावल्याचा आणि गळा दाबून हवेत उचलल्याचा आरोप प्रिन्सिपलवर करण्यात आला आहे. बाल न्याय कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला असून प्रकरणाचा पोलीस तपास सुरू आहे.

Namdeo Kumbhar

सुशील थोरात, अहिल्यानगर प्रतिनिधी

Ahilyanagar latest news : शाळा ही विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित जागा मानली जाते. मात्र, अहिल्यानगर शहराजवळ असलेल्या एका खासगी इंग्रजी माध्यम शाळेतून एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तिसऱ्या वर्गात शिकणाऱ्या एका ८ वर्षांच्या चिमुकल्याचा प्रिन्सिपलने चक्क हाताचा चावा घेतला, एवढ्यावरच न थांबता त्याचा गळा दाबून त्याला तब्बल २० सेकंद हवेत उचलून धरले.

या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात शाळेचे प्रिन्सिपल गौतम बहादुर्गे यांच्याविरोधात बालन्याय (Juvinile Justice Act) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिमुकल्याचे वडील सोनल शेळके यांच्या फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली आहे.

नेमकी घटना काय घडली?

मिळालेल्या माहितीनुसार, ८ वर्षांचा पीडित विद्यार्थी शाळेत असताना त्याच्या वर्गातील काही मुलांमध्ये आपापसात भांडण सुरू झाले होते. ही गोष्ट पीडित विद्यार्थ्याने आपल्या वर्गशिक्षिका ज्योती मॅडम यांना सांगितली. वर्गशिक्षिकेने तात्काळ प्रिन्सिपल गौतम बहादुर्गे यांना वर्गात बोलावून घेतले.

प्रिन्सिपल वर्गात आल्यानंतर त्यांनी भांडण करणाऱ्या विद्यार्थ्यांचे कान पिळले. त्यानंतर "भांडण कसे करतात हे मी तुम्हाला दाखवतो," असे म्हणत प्रिन्सिपलने त्या निष्पाप चिमुकल्याचा गळा धरून त्याला वर उचलले आणि १ ते २० आकडे मोजेपर्यंत (तब्बल २० सेकंद) त्याला तसेच टांगून ठेवले. यानंतर त्याला खाली उतरवून त्याच्या हाताचा जोरात चावा घेतला.

घरी गेल्यावर प्रकार उघडकीस; फोनवर माफीनामा

विद्यार्थी घरी आल्यानंतर त्याच्या शरीरावरील खुणा आणि वागण्यावरून पालकांच्या हा प्रकार लक्षात आला. घाबरलेल्या कुटुंबीयांनी त्याला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात नेले. त्यानंतर पालकांनी प्रिन्सिपलला फोनवरून जाब विचारला असता, "माझ्याकडून चुकीने ही घटना घडली आहे, मी लेखी माफीनामा पाठवतो, मला तुमचा पत्ता द्या," असे सांगून प्रिन्सिपलने प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला.

मात्र, चिमुकल्या बालकाचा असा अमानुष छळ करणे हा गंभीर अपराध असून, अशा विकृत मानसिकतेच्या प्रिन्सिपलवर कठोर कारवाई होऊन त्याला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी, अशी मागणी पीडित विद्यार्थ्याचे वडील सोनल शेळके यांनी केली आहे. या घटनेमुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील पालक वर्गात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुसळधार पावसाचा तडाखा; चाळीसगावजवळतच्या गांधी चौकातील नगरपालिकेची जुनी इमारत कोसळली

Cholesterol medicine: सकाळी की रात्री? रक्तवाहिन्यांमध्ये चरबी जमा झाल्यानंतर कोलेस्ट्रॉलची औषधं कधी घेतली पाहिजेत?

Beauty Tips: डार्क अंडरआर्म्सपासून सुटका हवी? तर हे उपाय करतील मदत

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचा दिपकेंना फोन, लग्नाबाबत काय विचारलं? | Video

..तर हे भोग मराठा समाजाच्या पदरी आले नसते; महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचं उत्तर

SCROLL FOR NEXT