राज्यातल्या शेतकर्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. महायुती सरकारनं जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातल्या पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांववर ३ हजार कोटी रुपयांची रक्कम जमा करण्यात येणार आहे. सहकार विभागाने यासाठी निधी उपलब्ध करून दिला असून, पुढच्या दोन दिवसांमध्ये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यांवर ही रक्कम जमा होण्याची प्रोसेस सुरू होणार आहे.
या योजनेअंतर्गत सरकारने दुसऱ्या टप्प्यात ३ लाख ५५ हजार ६१४ शेतकऱ्यांची यादी जाहीर केली होती. मात्र, काही बँकांकडून शेतकऱ्यांच्या कर्जाच्या रकमेत फेरफार झाल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर सहकार विभागाने संबंधित बँकांना सुधारित यादी सादर करण्याच्या सूचना दिल्या.
शेतकऱ्यांच्या नावांची तपासणी आणि आवश्यक प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर ३ लाख २७ हजार शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांवर रक्कम जमा करण्याची तयारी करण्यात आली आहे. या प्रक्रियेसाठी सरकारकडून ३ हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
दरम्यान, पहिल्या यादीतल्या १२ लाख ५८ हजार शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांवर १० हजार ११४ कोटी रुपयांची रक्कम जमा करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
आपलं नाव पात्र यादीत आहे का, याची खात्री केली पाहिजे.
बँक खात्याची माहिती आणि कर्जखात्याचे तपशील तपासावेत.
बँकेकडून कर्जाच्या रकमेत काही बदल असल्यास संबंधित शाखेशी संपर्क साधावा.
निधी जमा झाल्यानंतर खात्याचे स्टेटमेंट किंवा पासबुक अपडेट करून घ्यावे.
तसेच हा तिसरा हप्ता जमा झाल्याची माहिती आहे. बँकांनी जास्त व्याजदर लावल्याने हा हप्ता रखडला होता. पुढील अपडेट आल्यानंतर उर्वरित हप्ता जमा होणार असल्याची सहकारी विभागाची माहिती दिली आहे. तर या निर्णयामुळे पात्र शेतकऱ्यांना कर्जाच्या ओझ्यातून मोठा आर्थिक दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.