Eknath Maharaj Saam TV
महाराष्ट्र

दोन वर्षानंतर एकनाथ महाराजांची पालखी पायी निघणार; २७५ किलोमीटरचा प्रवास

कोरोनामुळे एकनाथ महाराजांच्या पादुका आणि काही मोजके वारकरी बसने पंढरपूरला गेले होते.

डॉ. माधव सावरगावे

दोन वर्षांच्या खंडानंतर यंदा पैठणहून एकनाथ महाराजांची पालखी (Eknath Maharaj Palkhi) पायी निघणार आहे. २० जून रोजी पैठणहून नाथ महाराजांच्या पालखी प्रस्थानाचा सोहळा पार पडणार आहे. त्यासाठी वारकरी आणि एकनाथ महाराज मंदिर समिती तयारीला लागलेत. कोरोनामुळे सलग दोन वर्षे एकनाथ महाराजांच्या पालखीच्या पायीवारी सोहळ्यात खंड पडला होता. कोरोनामुळे एकनाथ महाराजांच्या पादुका आणि काही मोजके वारकरी बसने पंढरपूरला गेले होते.

यंदाज मात्र वारकऱ्यांना एकनाथ महाराजांसोबत पंढरपूरच्या (Pandharpur) पांडूरंगाचे दर्शन घेता येणार आहे. पालखी मार्गावरील गावांतील भाविकांनीही पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी जय्यत तयारी सुरू केली आहे. संत एकनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्याचे २० जून रोजी पैठण येथून प्रस्थान झाल्यानंतर सलग १९ दिवस २७५ किलोमीटरचा प्रवास असणार आहे. या पायी सोहळ्यात ६९ गावांतून पालखी पुढे जात १९ ठिकाणी मुक्कामी थांबणार आहे.

८ जुलै रोजी संत एकनाथ महाराज पादुकाचा होळे गावातील भीमा स्नान सोहळा पार पडणार आहे. ९ जुलै रोजी दशमीला संत एकनाथ महाराजांचा पालखी सोहळा पंढरीनगरीत दाखल होणार आहे. १२ जुलै रोजी नाथ महाराजांचे पणजोबा संत भानुदास महाराज यांची पुण्यतिथी विठ्ठल मंदिरात साजरी करण्यात येते. पालखी सोहळ्याचा पंढरीत ४ दिवस नाथचौकातील नाथ मंदिरात मुक्काम असतो. नाथांच्या पालखी सोहळ्यात आणि पायी दिंडीमध्ये मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक वारकरी सहभागी होत असतात. यंदा वारकऱ्यांची संख्या वाढण्याची चिन्हे आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aadesh Bandekar Son: आदेश बांदेकरांचा लेक लवकरच अडकणार विवाह बंधानात; 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत थाटणार संसार

सासरच्या छळाला कंटाळली! महिला पोलीस कॉन्स्टेबलनं आयुष्य संपवलं; VIDEOतून केला खुलासा

Maharashtra Rain Live News: तब्बल आठ तासानंतर अंधेरी सबवे वाहतुकीसाठी खुला

Crop Insurance : मुदतवाढ देऊनही शेतकऱ्यांची पिक विम्याकडे पाठ; वर्धा जिल्ह्यातील केवळ ५९ हजार शेतकऱ्यांनी उतरविला विमा

Mumbai News: मुंबईत पोलीस वसाहतीत स्लॅब कोसळला, भीतीपोटी पोलीस अधिकाऱ्यानं सरकारी घर सोडलं

SCROLL FOR NEXT