साताऱ्यानंतर आता वाई मधील व्यापारी जिल्हा प्रशासनाच्या निर्णयाविरोधात रस्त्यावर ओंकार कदम
महाराष्ट्र

साताऱ्यानंतर आता वाई मधील व्यापारी जिल्हा प्रशासनाच्या निर्णयाविरोधात रस्त्यावर

त्यामुळे जिल्हा प्रशासनाने काही दिवसांपूर्वी अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व बाबी बंद ठेवण्याचे आदेश काढल्याने व्यापारी वर्गामध्ये कमालीची नाराजी पसरली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ओंकार कदम 

वाई - सातारा जिल्हात सध्या कोरोनाग्रस्तांच्या वाढत्या संख्येने जिल्हा प्रशासनाची झोप उडवली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने काही दिवसांपूर्वी अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व बाबी बंद ठेवण्याचे आदेश काढल्याने व्यापारी वर्गामध्ये कमालीची नाराजी पसरली होती. सातारा शहरातील व्यापाऱ्यांनी रस्त्यावर उतरून या निर्णया विरोधातील भूमिका स्पष्ट केली. After Satara, now the traders in Wai are on streets against decision of district administration

हे देखील पहा -

आता वाई मधील व्यापारी सुद्धा आक्रमक झाले असून त्यांनी सुद्धा कोरोना निर्बंध शिथिल करण्यासाठी व बाजारपेठ खुली करण्यास परवानगी मिळावी यासाठी हातात फलक घेऊन आंदोलन केले. वाई शहरातील व्यापारी संघटनांनी प्रशासनाच्या नियमांना अधीन राहून सोमवार पासून सर्व बाजारपेठ उघडणार असल्याचे यावेळी ठरवण्यात आले.

सर्व व्यापाऱ्यांनी आजपर्यंत प्रशासनाला संपूर्ण सहकार्य केले आहे. यापुढे सर्व निर्बंध असेच राहिले तर आम्हाला जगणे मुश्किल होईल. सर्व गोष्टींचा विचार करून बाजारपेठ उघडण्यास परवानगी द्यावी. अन्यथा सोमवार दि १२ पासून आपल्या नियमांना अधीन राहून सर्व बाजारपेठ सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत उघडणार आहोत असे निवेदन प्रांताधिकाऱ्यांना देण्यात आले.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

Makeup Side Effects: दररोज मेकअप केल्याने चेहऱ्यावर काय परिणाम होतो?

SCROLL FOR NEXT