Beed Minor Girl Rape Case Saam Tv
महाराष्ट्र

Beed Crime : पुण्यानंतर बीड हादरले! नराधम आजोबाचा ३ वर्षाच्या नातीवर अत्याचार, महाराष्ट्रात संताप

Beed crime news : बीड जिल्ह्यात अल्पवयीन मुलीशी संबंधित गंभीर गुन्ह्याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Namdeo Kumbhar

Beed Kej Crime News Update : पुण्यातील नसरापूर गावात ६५ वर्षाच्या नराधमाने साडेतीन वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून हत्या केल्याची घटना ताजी असतानाच, आता बीडच्या केज तालुक्यातही अशाच एका संतापजनक घटनेने महाराष्ट्र हादरलाय. रक्ताच्या नात्याला कलंक लावत बीडमध्ये ५० वर्षीय आजोबाने आपल्या ३ वर्षांच्या चिमुकल्या नातीवर अत्याचार केला. केज तालुक्यात ही संतापजनक घटना घडली असोल आरोपीला युसुफवडगाव पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, युसुफवडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात एक विवाहित तरुणी आपल्या ३ वर्षांच्या चिमुकलीसह माहेरी आली होती. १६ ते २५ एप्रिल दरम्यान संधी साधून या तरुणीच्या वडिलांनी (मुलीच्या आजोबाने) स्वतःच्याच ३ वर्षाच्या नातीवर अत्याचार केला.

या कृत्यानंतर चिमुकलीला त्रास होऊ लागल्याने तिने हा प्रकार आपल्या आईला सांगितला. आपल्याच वडिलांनी पोटच्या नातीसोबत असे घृणास्पद कृत्य केल्याचे ऐकून आईला मोठा धक्का बसला. पीडित मुलीच्या आईने तातडीने युसुफवडगाव पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.

या तक्रारीवरून पोलिसांनी नराधम आजोबाविरुद्ध पोक्सो (POCSO) कायद्याच्या कलम ४ आणि ६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच 'पिंक पथका'चे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शेळके यांनी तात्काळ आरोपी आजोबाला बेड्या ठोकल्या आहेत.

आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येणार असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. भोर, चाकण आणि आता बीडमध्ये घडलेल्या अत्याचारच्या या घटनांमुळे महाराष्ट्रात संतापाचे वातावरण आहे. कठोर कायद्यांची मागणी केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

डब्यांवर तेलकट, पिवळे डाग एका मिनिटात होतील गायब! वापरा हे भन्नाट उपाय

Drinking Water Advice: कडक उन्हातून घरी गेल्यावर लगेच घटाघट पाणी पिताय? सावधान! या ४ गोष्टी आताच टाळा, अन्यथा...

Aishwarya Rai: ऐश्वर्या राय कान्ससाठी राहते 'या' आलिशान हॉटेलमध्ये; एका दिवसाचा खर्च तब्बल १,५०,००० रुपये

NCP Merger: राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षांची मोठी प्रतिक्रिया; भाजपवर डागली तोफ

Maharashtra News Live Update: नंदूरबारमध्ये थकीत ऊस बिलासाठी नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक

SCROLL FOR NEXT