Devendra Fadnavis Saam TV
महाराष्ट्र

मी थांबणार नाही, घोटाळे बाहेर काढणारच; फडणवीसांचा 'मविआ' सरकारला इशारा

सुरज सावंत

मुंबई : आज देवेंद्र फडणवीसांची (Devendra Fadnavis) पोलिसांकडून दोन तास चौकशी झाल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला ते म्हणाले, 'पोलिसांकडून मला सहआरोपी बनवता येईल का असे प्रश्न विचारण्यात आले. राज्यात बदल्यांचा जो महाघोटाळा झाला त्याची माहिती मी केंद्रीय गृह सचिवांपर्यंत पोहोचवली ही माहिती सीबीआयने दिली असून हा महाघोटाळा घडला म्हणून CBI याची चौकशी करत असल्याचं त्यांनी सांगितलं.

मी जर हा विषय बाहेर काढला नसता तर हा विषय दबून गेला असता. सहा महिने हा घोटाळा सरकारने दाबला. मी बोललो नसतो तर तो दाबून टाकला असता असा आपोप त्यांनी राज्य सरकारवर केला. दरम्यान ते म्हणाले की पोलिसांकडून मीच गोपनिय माहितीच उल्लंघण केल्यासारखे प्रश्न विचारण्यात आले. काल पोलिसांनी मला हजर राहण्याची नोटीस पाठवली त्याचं कारण सभागृहात जे विषय मांडत आहे त्यामुळे अचानक अशी नोटीस मला दिली असल्याचा आरोपही फडणवीस (Devendra Fadnavis) यावेळी केला.

तसंच राज्य सरकारने जो घोटाळा दाबला त्याची कागदपत्रे मी दिली असती तर यांनी काय दिवे लावले असते. कव्हरिंग लेटर व्यतिरिक्त मी कोणतीही कागदपत्रे समोर आणली नाही. सर्व कागदपत्रे नवाब मलिक (Nawab Malik) यांनी दिली. त्याची चौकशी झाली. नवाब मलिक यांनी पत्रकारांना कागदपत्रे दिली. कितीही गोवण्याचा प्रयत्न केला तरी मला गोवण्यात येणार नाही कितीही गोवण्याचा प्रयन केला तरी मी थांबणार नाही मी घोटाळे बाहेर काढणारच असा इशारा त्यांनी यावेळी सरकारला दिला.

माझी चौकशी करण्याचा उपक्रम जो काही सरकारने राबवला आहे त्यातून काहीही हाथी लागणार नाही. सरकारला यातून काही हाती लागणार नाही त्यांचे मनसुबे यशस्वी होणार नाहीत दोन्ही प्रश्नावलीमध्ये खूप अंतर आहे. गृह मंत्र्यांनी काही सांगितले तरी माझे प्रिव्हिलेज काय आहेत हे मला माहित आहे. केंद्रीय यंत्रणांना हायकोर्टाने कारवाई करायला सांगितले आहे. दरम्यान त्यांनी यावेळी अजित पवारांच्या (Ajit Pawar) वक्तव्याचं समर्थन केलं, ते म्हणाले, ज्यांचा लोकशाहीवर विश्वास आहे त्याला नक्कीच असे वाटेल की अशी नोटीस देणे योग्य नाही.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur News: धर्मराज काडादी यांनी विधानसभा लढवण्याची केली घोषणा, सोलापूरमधून उमेदवारीसाठी शिंदेंना घातलं साकडं?

Ratnagiri Killing Case : स्वप्न पडलं, डेड बॉडीचं गूढ उलगडलं? रत्नागिरीतील हत्याकांडाचा सस्पेन्स उलगडणार? पाहा व्हिडिओ

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

SCROLL FOR NEXT