Gold Price  Saam TV
महाराष्ट्र

Gold Price: महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण, वाचा आजचे दर

Gold Rate Drops Significantly on May 1, 2024: अक्षय्य तृतीयेच्या दुसऱ्याच दिवशी, म्हणजे १ मे २०२५ रोजी, सोन्याच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. सोन्याच्या दरात झालेल्या घसरणीमुळे ग्राहकांना थोडासा दिलासा मिळाला आहे.

Bhagyashree Kamble

अक्षय्य तृतीयाच्या दुसऱ्याच दिवशी १ मे रोजी सोने स्वस्त झाले आहे. १ मे २०२५ रोजी सोन्याच्या किमतीमध्ये मोठी घसरण झाल्याची नोंद करण्यात आली आहे. मे महिना सुरू झाला की, लग्न सराईला सुरूवात होते. सराफा बाजारात सोन्याचे भाव गेल्या काही महिन्यांपासून गगनाला भिडले होते. ज्यामुळे सामान्य ग्राहकांच्या खिशाला झळ बसत होती. मात्र, अक्षय्य तृतीयेनंतर सोन्याच्या दरात घसरण झाली असून, यामुळे ग्राहकांच्या खिशाला काहीसा दिलासा मिळू शकतो.

कालच्या तुलनेत आज सोन्याचा दर तब्बल २,३०० रूपयांनी कमी झाला आहे. सध्या २२ कॅरेट सोन्याचा दर ८७,७०० रूपये प्रति १० ग्रॅम आहे, तर २४ कॅरेट सोन्याचा दर ९५, ७०० रूपये प्रति तोळा इतका आहे.सोन्याच्या किमतीसह चांदीच्या किमतीतही घसरण झाली आहे. चांदीचा भाव ९९,९०० रूपये किलो इतका आहे. चांदीच्या दरात घसरण झाल्यामुळे १ लाखांवर पोहोचलेला दर आता उतरला आहे.

यापूर्वी २२ एप्रिल रोजी सोन्याचा दर १ लाख रूपयांपर्यंत पोहोचला होता. परंतु, त्यानंतर सोन्याच्या किमतीत हळूहळू घसरण होत चालली होती. काल अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोन्याच्या वाढलेल्या किमतीमुळे खरेदी कमी झाली होती. त्यानंतर आजच्या किमतीत झालेल्या घसरणीमुळे बाजारात ग्राहकांची खरेदीसाठी हालचाल वाढण्याची शक्यता आहे.

सोन्याची किंमत कशी ठरवली जाते?

सोन्याची किंमत अनेक गोष्टींवर अवलंबून असते. आतंरराष्ट्रीय बाजारातील किमती, सरकारी कर आणि रूपयाच्या मूल्यातील चढ उतार,अशा अनेक कारणांमुळे भारतात सोन्याच्या किमतीत बदल होतो. सोने हे केवळ गुंतवणुकीचे साधन नाही तर, ते आपल्या परंपरा आणि सणांचा एक महत्त्वाचा भाग आहे. विशेषत: लग्न आणि सणांमध्ये त्याची मागणी वाढते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: राहुल गांधी VVIP नाही..., लवकर सुनावणीच्या मागणीवरून सुप्रीम कोर्ट संतापले

Weight Loss Tips: दिवाळीपूर्वी करा १० किलो वजन कमी; ६० दिवसांच्या डाएटमध्ये 'या' पदार्थांचा करा समावेश

Maharashtra News Live Update: नागपूरात युवा काँग्रेसचा मोर्चा; आंदोलक आक्रमक

Woman swallows 13 pens: पोटदुखीमुळे रूग्णालयात पोहोचली महिला; स्कॅन पाहून डॉक्टरही हैराण, पोटातून डॉक्टरांनी काढले 13 पेन, 5 लाकडी चमचे, मेणबत्ती

Toll Free Pass : गणेशोत्सवासाठी टोल फ्री पास कसा मिळवायचा? एका क्लिकवर जाणून घ्या

SCROLL FOR NEXT