Prakash Ambedkar Saam TV
महाराष्ट्र

Prakash Ambedkar News: 'उमेदवार निवडून येत नाही, तर...; प्रकाश आंबेडकरांनी ईव्हीएम मशीनवर व्यक्त केली मोठी शंका

Prakash Ambedkar News: वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी ईव्हीएम मशीनवर शंका उपस्थित केली आहे. निवडणुकीत उमेदवार निवडून येत नाही, तर ईव्हीएम मशीन निवडून येते, असा आरोप आंबेडकरांनी केला.

विजय पाटील

Prakash Ambedkar Latest News:

राज्यात सर्वच राजकीय पक्षांना आगामी निवडणुकांचे वेध लागले आहेत. सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांनी आगामी निवडणुकांसाठी बैठकांचा सपाटा लावला आहे. याचदरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी ईव्हीएम मशीनवर शंका उपस्थित केली आहे. निवडणुकीत उमेदवार निवडून येत नाही, तर ईव्हीएम मशीन निवडून येते, असा आरोप आंबेडकरांनी केला. (Latest Marathi News)

सांगलीच्या मिरजेत बहुजन वंचित आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी हदगाह मैदान येथे भेट दिली. यावेळी समस्त मुस्लिम समाज आणि मोहल्ला कमिटी यांची भेट घेतली. आंबेडकरांनी त्यांच्याशी आगामी निवडणुकीबाबत चर्चा केली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या चर्चेवेळी मुस्लिम बांधवांनी व्होटिंग मशीनबाबत प्रश्न निर्माण करून मार्गदर्शन करण्यास बाळासाहेब आंबेडकर यांना सांगितले. त्यावेळी सरकारने इलेक्शन कमिशन हे दोघेही ईव्हीएम मशीन तपासणीच्या विरोधात असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला.

दरम्यान, ईव्हीएम मशीनवर निवडणुका न करता बॅलेट पेपरवर आगामी निवडणुका घेण्यासाठी त्यांनी विविध पर्याय सांगितले. मात्र, जनतेतून जागृती करून बॅलेट पेपरवर निवडणुकांची मागणी झाली तर शासनाला पर्याय उरणार नाही असेही त्यांनी सांगितले.

PM मोदी स्वतःच्या प्रेमात अडकलेत; प्रकाश आंबेडकरांची टीका

तत्पूर्वी, सांगलीतील एका सभेत प्रकाश आंबेडकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. 'पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतःच्या प्रेमात मोदी अडकले आहेत. लाल किल्लावर पंतप्रधान मोदी भाषण करत असताना एकही माणूस नव्हता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतलेली बघितली काय? निवडणूका होईपर्यंत घेणार नाहीत. त्यांना पत्रकारांना समोर जाऊन उत्तर देण्यास पंतप्रधान मोदींना भीती वाटते, अशी टीका आंबेडकरांनी केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gajkesari Yog: गुरु चंद्राच्या युतीने बनला गजकेसरी राजयोग; 'या' राशींना मिळणार डबल इनकम; आयुष्यात होणार धनवृष्टी

Shahrukh Khan Real Name: किंग खानचे खरं नाव शाहरुख नाही तर 'हे' आहे; तुम्हाला माहितीये का?

Government Scheme: विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी मिळणार बिनव्याजी कर्ज; पीएम विद्यालक्ष्मी योजना नक्की आहे तरी काय?

Modi-Jinping: भारत-चीनमध्ये होणार नवी सुरुवात? रशियानंतर आता ब्राझीलमध्ये होऊ शकते मोदी-जिनपिंग भेट

Viral Video: चाळीतील महिलांची सर्वत्र चर्चा! दिलात झापुक झूपूक गाण्यावर केला जबरदस्त डान्स; VIDEO एकदा पाहाच

SCROLL FOR NEXT