Aditya Thackeray 2029 Maharashtra Chief Minister Saam Tv News
महाराष्ट्र

Aditya Thackeray : आदित्य ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार; माजी खासदाराचं भाकित, चर्चांना उधाण

Chandrakant Khaire on Aditya Thackeray : २०२९ मध्ये आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली निवडणूका होतील, आणि आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होणार. असं भाकीत छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी वर्तवलं आहे.

Prashant Patil

छत्रपती संभाजीनगर : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (ठाकरे गट)ने लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर विधानसभा निवडणुकीतही जोरदार कामगिरीची अपेक्षा ठेवली होती. मात्र, महायुतीने विधानसभेत कमबॅक करत महाविकास आघाडीला जोरदार धक्का दिला. पण, ठाकरे गटाने आता महापालिका निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे लक्ष केंद्रित करत ठाकरे गटाने तयारी युद्धपातळीवर सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे माजी मंत्री चंद्रकांत खेरे यांनी सूचक विधान केलं आहे.

२०२९ मध्ये आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली निवडणूका होतील, आणि आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होणार. असं भाकीत छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी वर्तवलं आहे. जालन्यात एका लग्न समारंभात भेट देण्यासाठी आलेले असतांना खैरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी २०२९ साली भाजपचे अध:पतन होऊन, शिवसेना सत्तेत येणार असल्याचा विश्वासही व्यक्त केला. रावसाहेब दानवेंनी सिग्मा हॉस्पिटलमध्ये बसून माझा २०१९च्या लोकसभा निवडणुकीत पराभव केला. असा आरोप खैरे यांनी केला. आमच्याच नगरसेवक आणि नेत्याला पैसे देऊन दानवेंनी मला पराभूत केले. त्यामुळे २०२४ च्या निवडणुकीत दानवेंना देवाने जालन्यात पराभूत केले, असा टोला खैरे यांनी रावसाहेब दानवे यांना लगावला. मैदान पुढं आहे आम्ही पुन्हा परत येणार, असा इशारा देखील खैरे यांनी भाजपला दिला आहे.

राज्यात आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत असून, या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. विशेषतः मुंबई, पुणे, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या चार महत्त्वाच्या महापालिकांवर ठाकरे गटाचं मजबूत लक्ष आहे. सध्या या सर्वच महापालिकांमध्ये प्रशासकांकडून कारभार चालविला जात आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना या चारही महापालिकांमध्ये ताकद लावून काम करण्याच्या तयारीत आहे. येत्या निवडणुकीत या महापालिकांवर वर्चस्व मिळवण्यासाठी विशेष नियोजन केले जात असून, त्यासाठी काही नेते व उपनेत्यांवर स्वतंत्र जबाबदाऱ्या सोपवण्यात येणार आहेत.

येत्या मंगळवारी ठाकरे गटाची एक महत्त्वाची बैठक होणार असून, या बैठकीत आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी रणनीती ठरवली जाणार आहे. त्यात नेते व उपनेत्यांना महानगरपालिकानिहाय जबाबदाऱ्या देण्यात येणार आहेत. बैठकीनंतर जबाबदारीचे अधिकृत वाटप केले जाईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Todays Horoscope: 'या' नोकरीमध्ये काही बदल होण्याची शक्यता; जाणून घ्या राशीभविष्य

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

SCROLL FOR NEXT