Aditya Thackeray:
Aditya Thackeray: saam tv
महाराष्ट्र

Aditya Thackeray Nagpur Visit: कोराडी वीज प्रकल्प आंदोलनात आदित्य ठाकरे यांची उडी; आज नागपूर दौऱ्यावर

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

Aditya Thackeray News Today: कोराडी येथे प्रस्तावित ६६० मेगावॅटच्या दोन वीज युनिटच्या विरोधात स्थानिक नागरिक व पर्यावरणवाद्यांनी दंड थोपटले आहे. आता या वादात माजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनीही उडी घेतली आहे. आज (२२ मे) आदित्य ठाकरे हे नागपूर दौऱ्यावर असणार आहेत. त्यांचे शहरात आगमन होताच युवासेनेतर्फे त्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. काही वेळाने ते हॉटेल रॅडिसन ब्लूला रवाना होतील. (Latest Marathi News)

हॉटेलमध्ये पर्यावरणप्रेमींशी चर्चा करणार आहे. त्यानंतर कोराडी परिसरातील नांदगाव, वराडा येथील गावाला भेट देखील ते भेट देणार असून गावकरी व शेतकऱ्यांशी (Farmer) संवाद साधणार आहे. दरम्यान, अजनीतील वृक्षतोडीच्या प्रश्नावरही ते पर्यावरणप्रेमींशी चर्चा करणार आहेत.

यापूर्वी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी कोराडी आणि खापरखेडा वीज प्रकल्पाला दोन वेळा भेट देऊन केली पाहणी होती. वीज प्रकल्पातून निघणाऱ्या राखेमुळे होत असलेली पर्यावरनाची हाणी लक्षात घेता राख बंधारे बंद करण्याचे निर्देश दिले होते. तसेच या प्रकरणाचा शेवटपर्यंत त्यांनी आढावा घेतला. त्यानंतर राज्यात सत्तापालट झाले. आता पुन्हा एकदा कोराडी येथे नवीन वीज युनिटवरुन आंदोलन सुरू झाले आहे. (Nagpur News)

या आंदोलनात मोठ्या प्रमाणात शेतकरी, गावकऱ्यांसोबतच लगतच्या वसाहतीतील नागरिक सहभागी झाले आहेत. या वीज प्रकल्पासाठी होणाऱ्या जनसुनावणीला देखील आदित्य ठाकरे यांनी विरोध केला आहे. त्यांच्या या दौऱ्यादरम्यान आदित्य ठाकरे अजनीवनचे पर्यावरणवादी आणि या आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व लोकांची ते भेट घेऊन त्यांच्यासोबत संवाद साधणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांच्या या नागपूर दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

भावी मुख्यमंत्री म्हणून लागले होर्डिंग्ज

आदित्य ठाकरे आज नागपूर दौऱ्यावर आहे. मात्र त्याआधीच नागपुरात (Nagpur) रामटेक मनसर परिसरात आदित्य ठाकरे यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून ठिकठिकाणी होर्डिंग्ज लागले आहेत. युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी हे होर्डिंग्ज लावल्याची माहिती समोर आली आहे. या होर्डिंग्जवर आदित्य ठाकरे यांची भावी मुख्यमंत्री म्हणून उल्केख करण्यात आला आहे त्यामुळे या होर्डिंगची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Petrol Diesel Rate 2nd May 2024: पुण्यात पेट्रोल महागलं अन् डिझेल स्वस्त झालं; वाचा तुमच्या शहरातील आजचे दर

उन्हाळ्यात प्या ही 5 पेय, Blood Sugar राहील नियंत्रणात

Pushpa Pushpa Song : ‘पुष्पा द रुल’मधलं पहिलं गाणं रिलीज, भन्नाट हूकस्टेप्स पाहून तुम्हीही थिरकाल

Sharad Pawar: PM मोदींकडून पंतप्रधानपदाची अप्रतिष्ठा; लोकांना मुद्द्यांपासून वळवण्याचे काम सुरू... शरद पवारांचे टीकास्त्र

Today's Marathi News Live : उद्धव ठाकरे यांची आज सांगलीत सभा

SCROLL FOR NEXT