Gunvant Sadavarte Saam TV
महाराष्ट्र

Gunvant Sadavarte : गुणरत्न सदावर्तेंचा निषेध; मराठा संघटनेचे कार्यकर्ते का झालेत आक्रमक?

मराठा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उस्मानाबाद येथे या मागणीला तीव्र विरोध दर्शवत आंदोलन केले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Gunratna Sadavarte : मराठवाड्यात असलेला अविकसितपना, दारिद्र्य अशा सर्व गोष्टी दूर करण्यासाठी मराठवाडा स्वतंत्र राज्य करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. अशात विदर्भ आणि मराठवाडा अशी दोन स्वतंत्र्य राज्ये असावीत अशी मागणी वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे. आता त्यांच्या या मागणीला मराठा संघटनेकडून विरोध केला जात आहे. मराठा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उस्मानाबाद येथे या मागणीला तीव्र विरोध दर्शवत आंदोलन केले आहे. (Latest Marathi News)

उस्मानाबाद (Osmanabad) येथे आज स्वतंत्र मराठवाडा या विषयावर एका परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यात गुणरत्न सदावर्ते उपस्थित राहून परिषदेला संबोधित करणार होते. मात्र त्यांच्या विरोधात माराठा संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले. यावेळी त्यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

आंदोलनात कार्यकर्ते सदावर्तेंच्या दिशेने घोषणाबाजी करत जात होते. मात्र त्याआधीच पोलिसांनी त्यांना थांबवले असून ताब्यात घेतले. गुणरत्न सदावर्ते मराठा आरक्षण आणि एसटी (ST) कर्मचाऱ्यांचा संप या दोन मुद्द्यांनंतर आता पुन्हा एकदा स्वतंत्र विदर्भाच्या मुद्यावरून चर्चेत आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नीलम गोर्हे कल्याण जीआरपी पोलीस ठाण्यात दाखल

Gold Investment: आता NSE वर शेअर्सप्रमाणे खरेदी करू शकाल सोने; काय आहे EGR? जाणून घ्या फायदे-तोटे

एकनाथ शिंदेंना मोठा धक्का बसणार, शिवसेनेतील बडा नेता नाराज? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Accident: पालघरमध्ये वऱ्हाडाच्या ट्रकला कंटेनरची धडक, १२ जणांचा मृत्यू; मुंबई- अहमदाबाद महामार्गावर रक्ताचा सडा

Makeup Box Full Kit: परफेक्ट मेकअप लूकसाठी बॉक्समध्ये असायला पाहिजेत 'हे' ब्यूटी प्रॉडक्ट

SCROLL FOR NEXT