टॉकिंग फायनान्सच्या फसवणुकीतील दीड कोटी रुपयांसह आरोपीला चेन्नईतुन अटक  दीपक क्षीरसागर
महाराष्ट्र

टॉकिंग फायनान्सच्या फसवणुकीतील दीड कोटी रुपयांसह आरोपीला चेन्नईतुन अटक

लातूर शहरातील एका व्यापाऱ्याला व्यवसायासाठी 100 कोटी रुपयांची आवश्यकता होती. या व्यापाऱ्याला एका भामट्याने चक्क कमिशन पोटी दीड कोटी रुपयांचा गंडा घातला होता.

दीपक क्षीरसागर

लातूर : लातूर शहरातील एका व्यापाऱ्याला व्यवसायासाठी 100 कोटी रुपयांची आवश्यकता होती. या व्यापाऱ्याला एका भामट्याने चक्क कमिशन पोटी दीड कोटी रुपयांचा गंडा घातला होता. याप्रकरणी लातूर पोलिसांनी चेन्नईतुन भामट्याला अटक करत दीड कोटी रुपये व्यापाऱ्याला मिळवून दिले आहेत.

हे देखील पहा -

लातुर शहरातील मैत्री पार्क येथील रहिवासी असलेले 44 वर्षीय धनराज नरसिंगदास पल्लोड या व्यापाऱ्यांला व्यवसायासाठी 100 कोटी रुपयांची गरज होती ही गरज पूर्ण करण्यासाठी दिपक कुमार नामक व्यक्ती 100 कोटी रुपये कर्ज उपलब्ध करून देण्याचा अमिष दाखवलं या व्यापाऱ्यांला दीपक कुमार यांनी जतीन शहा याची ओळख करून दिली ते सर्वजण तामिळनाडू राज्यातील चेन्नई इथं गेले तिथं त्यांना ईश्वर रामन उर्फ समीर कादरी या व्यक्तीने 100 कोटी किंवा त्यापेक्षा जास्त कर्ज कोणत्याही कागदपत्रे शिवाय मिळवून देऊ अस सांगितले होते.

त्यानंतर विश्वास ठेवत धनराज पल्लोड यांनी लातूरच्या गांधी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आंध्रा बँक (आताची युनियन बँक) येथील खात्यातून कादरी यांच्या चेन्नईतील बँक खात्यात तब्बल 1 कोटी 52 लाख 50 हजार रुपये RTGS द्वारे दिले त्यानंतर आपण फसवलो गेलो हे लक्षात आले असता धनराज पल्लोड यांनी डिसेंबर 2020 मध्ये गांधी पोलीस ठाण्यात IPC 420, 406 आणि 34 नुसार गुन्हा दाखल केला.

याप्रकरणी लातूर पोलिसांनी पथक स्थापन करून चेन्नईला पाठवले तिथं ईश्वर कादरी यास अटक करून लातूरला आणण्यात आले. पल्लोड यांनी RTGS द्वारे पाठवलेले 1 कोटी 52 लाख 50 हजार रुपये हस्तगत करून धनराज पल्लोड यांना लातूर पोलिसांनी ताब्यात दिले आहेत. याप्रकरणी समीर कादरी, आदित्यराम, जिना कादरी, नरसिंह रामदास, व्ही एम मोहम्मद दाऊद खान, आणि मोहम्मद अली अशी सहा आरोपी असुन त्यापैकी समीर कादरी यास पोलिसांनी अटक केली आहे अश्या टॉकिंग फायनान्सच्या जाळ्यात नागरिकांनी अडकू नये असं आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर जगदाळे यांनी केले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नांदूर-मध्यमेश्वर धरणातून गोदावरी पत्रात पाण्याचा विसर्ग वाढवला

Shocking News : संतापजनक! राजकीय वाद टोकाला, महिला मध्यरात्री उठली अन्...

Mithila Palkar: मिथिला पालकरचं वय वाढतय अन् सौंदर्यही खुलतय...

Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील सातही आरोपींची नावं समोर; कोकेन-गांजा, १० मोबईल अन् २ कार जप्त

Anil Gote : भ्रष्टाचाऱ्यांसाठी जेल म्हणजे भाजप कार्यालय; माजी आमदार अनिल गोटेंचा सरकारवर हल्लाबोल

SCROLL FOR NEXT