Aurangabad Crime Saam Tv
महाराष्ट्र

१७ वर्षीय युवकाचा शेजारी राहणाऱ्या ५ वर्षाच्या मुलीवर बलात्कार; पोलिसांकडून अटक

५ वर्षांच्या चिमुकलीला शॅम्पू आणून दे, असे सांगून घरात बोलावून तिच्यावर बलात्कार

डॉ. माधव सावरगावे

औरंगाबाद: एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने शेजारी राहणाऱ्या ५ वर्षांच्या चिमुकलीला शॅम्पू आणून दे, असे सांगून घरात बोलावून तिच्यावर पाशवी बलात्कार केला आहे. ही धक्कादायक घटना अजिंठा येथील इंदिरा नगर झोपडपट्टीमध्ये शनिवारी घडली. अजिंठा पोलिसांनी (police) आरोपीस (Accused) ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरापर्यंत चिमुकलीवर रुग्णालयात (hospital) वैद्यकीय तपासणी सुरू होती.

हे देखील पाहा-

५ वर्षीय चिमुकली व आरोपी दोघेही शेजारी- शेजारीच राहतात. आरोपीच्या (accused) घरातील सर्व सदस्य कामानिमित्त बाहेर गावी गेले होते. हीच संधी साधून आरोपीने घराशेजारी राहणाऱ्या चिमुकलीला तिच्या आई समोर शॅम्पू आणण्यासाठी बोलावले. तिने शॅम्पू आणून दिल्यावर आरोपीने घराचे दार लावले व तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आहे. मुलगी किंकाळत असताना ही त्याला तिची कीव आली नाही. मुलीच्या आईला मुलीच्या ओरडण्याचा आवाज आला. तिने लगेच दार ठोठावला पण आरोपीने बराचवेळ दार उघडले नाही. मुलीला त्याच अवस्थेत सोडून मागील दारातून आरोपी पसार झाला. ती चिमुकली रक्ताच्या थारोळ्यात पडून होती.

त्यानंतर मुलीचे आई- वडील व नातेवाईकांनी अजिंठा पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. अजिंठा येथील ग्रामीण रुग्णालयात मुलगी व मुलाचे मेडिकल करण्यात आले आहे. त्यानंतर दोघांना पुढील मेडिकल व डीएनएसाठी औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया, अप्पर पोलीस अधीक्षक पवन बन्सोड, उपविभागीय पोलीस अधिकारी विजय मराठे, पोलीस निरीक्षक अजीत विसपुते,अक्रम पठाण यांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज - उद्धव ठाकरे यांच्या शिवतीर्थावरील भेटीची इनसाइड स्टोरी काय? बघा VIDEO

BMC Election: मिशन बीएमसी; शिवसेनेनं महापालिकेसाठी कंबर कसली, 21 शिलेदारांवर सोपवली जबाबदारी

Thursday Horoscope : विनाकारण खर्च वाढणार, प्रेमात धोका मिळणार; ५ राशींच्या लोकांना राहावे लागेल सावध

Maharashtra Live News Update : मंत्री भरत गोगावले यांना पोलादपुरमध्ये महिला बचत गटातील महिलांना मोलाचा सल्ला

Pune : पुण्यात खळबळ! रस्त्याच्या कडेला आढळलं ५ महिन्यांचं मृत अर्भक

SCROLL FOR NEXT