Chhatrapati Sambhaji Nagar Accident  SAAM TV
महाराष्ट्र

Accident News : प्रवाशांनी भरलेली एसटी बस- टेम्पो समोरासमोर धडकले; बसच्या पुढच्या भागाचा चेंदामेंदा, भीषण अपघातानंतर हल्लकल्लोळ

Chhatrapati Sambhaji Nagar Accident : जखमींना उपजिल्हा रुग्णालय सिल्लोड येथे रुग्णवाहिकेच्या माध्यमातून हलवले जात आहे.

माधव सावरगावे, औरंगाबाद

Chhatrapati Sambhaji Nagar Accident News : छत्रपती संभाजीनगरमध्ये एसटी बस आणि गॅस सिलेंडरची वाहतूक करणाऱ्या टेम्पोचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात टेम्पोचा ड्रायव्हर जागीच ठार झाला आहे. इतर जखमींना उपजिल्हा रुग्णालय सिल्लोड येथे रुग्णवाहिकेच्या माध्यमातून हलवले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार अपघातग्रस्त बसमधून 35 ते 40 प्रवासी प्रवास करत होते. अपघातानंतर सर्व जखमींना उपजिल्हा रुग्णालय सिल्लोड येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर गंभीर जखमी असलेल्यांना छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) येथे पुढील उपचारासाठी हलवण्यात येत आहे. (Accident News)

गॅस वाहतूक करणारा टेम्पो भराडीकडून सिल्लोडला येत होता तर सिल्लोड-पाचोरा ही बस सिल्लोडकडून पाचोराकडे जात होती. दरम्यान वांगी फाट्याजवळ या दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात. तिघांचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे, तर गॅस वाहतूक करणाऱ्या टेम्पोचा ड्रायव्हर जागीच ठार झाल्याची माहिती मिळाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा विस्कळीत; जलद मार्गावरील वाहतूक ठप्प, सध्या परिस्थिती काय?

Maharashtra News Live Update: मस्जिद बंदर स्थानकात तांत्रिक बिघाड; प्रवाशांचा रेल्वे ट्रॅकवरून प्रवास

Genelia Deshmukh Photos: साडी आणि मराठमोळे दागिने, देशमुखांच्या सुनेचा 'राजेशाही' थाट! Photo पाहतच राहाल

KDMC: शिक्षण साहित्याची सक्ती करणाऱ्या शाळांवर होणार कारवाई ; केडीएमसी शिक्षण विभाग अॅक्शन मोडवर

Bone cancer symptoms: ही लक्षणं दिसली तर समजा हाडांचा कॅन्सर शरीरात करतोय घर, वेळीच डॉक्टरांना दाखवा

SCROLL FOR NEXT