Accident On Sangali Ashta Saamtv
महाराष्ट्र

Accident News: सांगलीच्या आष्टा येथे तीन गाड्यांचा भीषण अपघात, एक जागीच ठार; चौघांची प्रकृती चिंताजनक

गाडी ओव्हरटेक करण्याच्या नादात हा अपघात घडला असल्याचे सांगितले जात आहे. (Sangali Accident)

विजय पाटील साम टीव्ही सांगली

Sangali: गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली राज्यातील रस्ते अपघातांची मालिका सुरूच आहे. आज सांगलीच्या आष्टा येथे तीन वाहनांचा तिहेरी अपघात घडला आहे. यामध्ये एक जण ठार तर दहा जण गंभीर जखमी झाले आहेत. तसेच जखमींमधील चौघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. (Latest Marathi Update)

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, आज सांगलीच्या आष्टा येथे तीन वाहनांचा तिहेरी अपघात घडला आहे. यामध्ये एक जण ठार तर दहा जण गंभीर जखमी झाले आहेत. तसेच जखमींमधील चौघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. सांगलीच्या आष्टा येथे बागणी रोडवरील शिंदेमळ्यानजीक स्कॉर्पिओ, एर्टिगा आणि इंडिका या तीन वाहनांमध्ये भीषण अपघात झाला.

या अपघातात कवठेमहांकाळ तालुक्यातील कुची येथील माजी सरपंच संतोष पाटील हे ठार झाले आहेत. तर दहा जण गंभीर जखमी झाली आहेत, ज्यामधील चौघांची प्रकृती चिंताजनक आहे. अपघातात जखमी झालेले युवक पलूस तालुक्यातील नागठाणे आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील आहेत. (Accident News)

दरम्यान, या अपघातातील जखमींना सांगलीच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. गाडी ओव्हरटेक करण्याच्या नादात हा अपघात घडला असल्याचे सांगितले जात आहे. या अपघातात तीनही गाड्यांचे मोठे नुकसान झाले असून याबाबत आष्टा पोलिस अधिक तपास करत आहेत. (Sangali News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Rain: अवकाळीचा फटका 'लालपरी'ला, एसटी बसला लागली गळती; VIDEO व्हायरल

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात 34% ने वाढ?

महाराष्ट्रात बदल्याचा धडाका कायम; आता २५ बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती?

Pune : पुणे बनतंय ड्रग्ज कॅपिटल; अल्पवयीन मुलीमुळे ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश

Maharashtra Politics: राज्याच्या राजकारणात आणखी एक भूकंप? राष्ट्रवादी-शिंदेसेनेचे 50 आमदार भाजपात जाणार, बड्या नेत्याचा दावा

SCROLL FOR NEXT