Pune Benglore Highway Bus Accident Saamtv
महाराष्ट्र

Karad Accident News: पुणे- बंगळूर महामार्गावर बसचा भीषण अपघात; चालकासह १५ प्रवाशी जखमी

Bus Accident News: चालकाचा ताबा सुटल्याने पूलाच्या कठड्याला धडकून महामार्गावर पलटी झाली.

संभाजी थोरात

Pune Benglore Highway Bus Accident: पुणे बेंगलोर आशियाई महामार्गावर बस अपघात झाल्याची मोठी घटना समोर आली आहे. कराड तालुक्यातील शिवडे गावच्या हद्दीत उत्तर मांड नदीच्या पुलावर भरधाव वेगाने जाणारी एसटी बस पलटी होऊन हा भीषण अपघात झाला. या अपघातात चालक व क्लिनर गंभीर जखमी झाले असून पंधरा ते वीस प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. (Accident News)

बसचा अपघात...

याबाबत अधिक माहिती अशी की, याबाबत माहिती अशी की, कराडहून (Karad To Satara) सातारा दिशेकडे जाणारी विजापूर-सातारा एसटी (क्रमांक केए-२८- २३५०) चालकाचा ताबा सुटल्याने पूलाच्या कठड्याला धडकून महामार्गावर पलटी झाली.

एसटी धडकल्याने मोठा आवाज झाला. त्यामुळे शिवडे तसेच परीसरातील नागरिकांनी व महामार्गावरून ये-जा करणाऱ्या प्रवाशानी जखमींना तात्काळ बाहेर काढून उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले. (Accident News)

दरम्यान, एसटीमध्ये तीस प्रवाशी होते. या अपघातात जवळपास दहा ते पंधरा प्रवाशी जखमी झाले आहेत. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच उंब्रज पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून अपघाताचा पंचनामा करण्याचे काम सुरू आहे. घटनास्थळी पोलिस हवालदार आळंदे, निलेश पवार, भोसले, काळे यांनी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: ३५ लाख लाडक्या बहि‍णींचा हप्ता रखडणार, ₹१५०० न मिळण्याचे कारण आले समोर

Panchang Today: आज द्विजप्रिया संकष्टी चतुर्थी! पंचांग, शुभ मुहूर्त आणि ‘या’ चार राशींसाठी दिवस लाभदायक

Maharashtra Live News Update: लोकसभा दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब

Palak Oats Tikki : घरच्या घरी बनवा हेल्दी अन् टेस्टी पालक ओट्स टिक्की, वाचा सोपी रेसिपी

UPI New Rules: UPIचे नियम बदलले! गुगल पे, फोन पे आणि पेटीएम युजर्सवर होणार परिणाम

SCROLL FOR NEXT