Nashik Accident News Saamtv
महाराष्ट्र

Nashik Accident News: शतपावली करताना काळाचा घाला! भरधाव दुचाकीच्या धडकेत महिलेचा मृत्यू; भीषण अपघात CCTVत कैद

Nashik News Update: अपघातातील मृत महिलेच्या पतीचा दोन वर्षांपूर्वी कोविडमध्ये मृत्यू झाला होता.

Gangappa Pujari

तबरेज शेख, प्रतिनिधी...

Nashik News: रात्री जेवण करून शतपावली करणाऱ्या महिलेला दुचाकी स्वाराने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने तिचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना समोर आली आहे. या अपघातात तर सहा वर्षीय बालक जखमी झाला आहे. नाशिक (Nashik) जेलरोड परिसरात ही ह्रदयद्रावक घटना समोर आली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Latest Marathi News)

याबाबत अधिक माहिती अशी की, जेलरोड येथील आदर्श सोसायटीमधील रहिवासी करुणा अशोक जोगदंड, रंजना हिरे, मंगल निकम, सोनाली विनीत उन्हवणे व सहा वर्षीय मुलगा इशांत उन्हवणे या रात्रीच्या वेळी जेवण करून शतपावली करीत होत्या. याचवेळी मंजुळा स्वीट्ससमोर पाठीमागून आलेल्या मोटारसायकलने (MH 15 FW 1474) त्यांना जोरदार धडक दिली.

या धडकेत करुणा अशोक जोगदंड (वय, ४५) यांच्या डोक्याला, नाका तोंडाला, व छातीला जोरदार दुखापत झाली तर ६ वर्षीय इशांतच्या कंबरेला मार लागला. अपघातात जबर जखमी झालेल्या करुणा अशोक जोगदंड यांना तात्काळ बिटको रुग्णालयात दाखल केले गेले. मात्र रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना उपचारापुर्वीच मृत झाल्याचे घोषित केले. तर सहा वर्षीय इशांतला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.

या प्रकरणी सोनाली विनीत उन्हवणे यांनी नाशिकरोड पोलिसांत फिर्याद दाखल केली असून दुचाकीस्वार समर्थ कदम यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलीस उपनिरीक्षक गणपत काकड या घटनेचा अधिक तपास करीत आहेत. हा भयंकर अपघाताचा व्हिडिओ सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

दरम्यान, करुणा जोगदंड यांचे पती अशोक जोगदंड यांचा दोन वर्षांपूर्वी कोविड मध्ये मृत्यू झाला होता. त्यानंतर भीषण अपघातात त्यांच्यांवरही काळाने घाला घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. (Accident News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart attack - घरी एकटे असताना हार्ट अटॅक आला तर काय कराल? 'या' ३ गोष्टी वाचवू शकतात तुमचा जीव

सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला मोठा झटका, थेट नोटीस पाठवली, सुनावणीत काय घडलं?

Shraddha ritual: श्राद्धाच्या दिवशी कावळा आला नाही तर ते अन्न कोणाला द्याल? जाणून घ्या नियम

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Accident: पर्यटकांनी खचाखच भरलेली बस पुलावरून खाली कोसळली, ३ जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT