Bus Accident News  Saam Tv
महाराष्ट्र

Nandurbar : जळगावच्या विद्यार्थ्यांनी भरलेल्या बसला अपघात; चालक घटनास्थळावरून फरार

गुजरातमध्ये विद्यार्थ्यांनी भरलेली बस उलटल्याची घटना घडली आहे. महाराष्ट्र गुजरात सीमावर्ती भागातील गावात हा अपघात घडला आहे.

दिनू गावित, साम टीव्ही नंदूरबार

Bus Accident news : गुजरातमध्ये विद्यार्थ्यांनी भरलेली बस उलटल्याची घटना घडली आहे. महाराष्ट्र गुजरात सीमावर्ती भागातील गावात हा अपघात घडला आहे. शुक्रवारी सकाळी आठ वाजणाच्या सुमारास हा अपघात झाला आहे. या अपघातात काही विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. (Latest Marathi News)

महाराष्ट्र गुजरात (Gujrat) सीमावर्ती भागातील तापी जिल्ह्यातील कुकरमुंडा तालुक्यातील राजपूर गावाजवळ विद्यार्थ्यांनी भरलेली बस उलटली आहे. या अपघातात सुमारे ४ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती निझर पोलीसांनी (Police) दिली आहे.

जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील अमळनेरहून गुजरात राज्यातील पावागडला जाणाऱ्या खासगी प्रवासी बसचा अपघात झाला आहे. बसमध्ये दहावीत शिकणारे ५१ विद्यार्थी (Student) आणि शिक्षकांसह ६५ प्रवासी होते. बस चालकाच्या चुकीने बस रस्त्याच्या कडेला उतरली, बस विजेच्या खांबाला धडकून उलटली. यात चार विद्यार्थी जखमी झाले आहे. (Bus Accident News)

अमळनेर शहरातील लोकमान्य हायस्कूलचे विद्यार्थी होते.विश्वकर्मा टूरिस्ट ट्रॅव्हल्स खाजगी बस चालक हा घटनास्थळावरून फरार झाला आहे.घटनेची माहिती मिळताच निझर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून चालकावर मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Scam : राज्यपालांच्या PA च्या नावाने रेल्वेच्या VVIP तिकिटांचा घोटाळा! 'लोकभवन'च्या बनावट लेटरहेडचा वापर; ७ जणांना अटक

PF Transfer : जुनं PF खाते बंद झालं? EPFO च्या नव्या पोर्टलमुळे अडकलेले पैसे, Active UAN मध्ये ट्रान्सफर करणं झाले जास्त सोपं

Maharashtra News Live Update:भिवंडी इमारत दुर्घटना; मुख्यमंत्री फडणवीसांची घटनास्थळी पाहणी, महापालिका आयुक्तांना तातडीच्या कारवाईचे आदेश

Lung cancer: तरूणांच्या शरीरात गपचूप घर करतो फु्फ्फुसांचा कॅन्सर; सुरुवातीची 5 लक्षणं वेळीच ओळखा

Vaidehi Parshurami: जांभळी साडी, नाकात नथ अन् कपाळावर चंद्रकोर; वैदेही परशुरामीचा मराठमोळा अंदाज

SCROLL FOR NEXT