satara, pune banglore national highway, accident saam tv
महाराष्ट्र

Pune Banglore National Highway : देवासारखे धावून आलात ! ट्रक चालकानं जाेडले सातारा पाेलिसांसमाेर हात

दोन्ही अपघातग्रस्त ट्रक चालक हे जखमी झाले असून त्यांना सातारा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

ओंकार कदम

Pune Banglore National Highway : सातारा शहरानजीक असणाऱ्या पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर रात्री उशिरा बॉम्बे रेस्टॉरंट चौकाच्या पुलावर सांगलीहून (Sangli) पुण्याकडे (pune) निघालेल्या ट्रक चालकाचा अचानक ताबा सुटला. यामुळे ट्रक मधोमध असणाऱ्या दुभाजकाला धडकला. त्यामुळे ट्रक दुभाजकात अडकून राहिला. (Satara Accident Latest News)

दरम्यान यावेळी पाठीमागून येणाऱ्या दुसऱ्या चालकाला स्वतःचा ट्रक नियंत्रणात न करता आल्याने त्याच्या ट्रकची अपघातग्रस्त ट्रकला जोरदार धडक बसली. यामध्ये पाठीमागील ट्रक मधील चालक हा केबिनमध्ये अडकला.

या घटनेची माहिती सातारा पाेलिसांना समजताच त्यांनी क्रेन मागवली. त्यानंतर सातारा पोलिसांनी क्रेनच्या मदतीने केबिनमध्ये अडकलेल्या ट्रक चालकाला तब्बल तासाभरानंतर सुरक्षित बाहेर काढले. यावेळी ट्रक चालकाच्या डाेळ्यात आनंदाचे अश्रु हाेते. त्याने सातारा पाेलिसांचे हात जाेडून आभार मानले. दोन्ही अपघातग्रस्त ट्रक चालक हे जखमी झाले असून त्यांना सातारा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अशोक खरातला ३ दिवसांची पोलीस कोठडी

India Russia Deal 2026: ३००० सैनिक, ५ युद्धनौका अन्...; भारत-रशियामध्ये मोठा लष्करी करार, पाकिस्तानची चिंता वाढली

FASTag पासच्या नावाखाली होतेय फसवणूक, एका चुकीमुळे होईल अकाउंट रिकामं; NHAI ने केलं अलर्ट

Face Fat Yoga: हनुवटी आणि गळ्यावरची चरबी ७ दिवसात करा कमी रोज फक्त १० मिनिट करा 'हा' फेस योगा

Heart Attack Women: सावधान! हार्ट अटॅक येण्याच्या महिनाभरआधी महिलांमध्ये दिसतात ही सामान्य लक्षणं, दुर्लक्ष करणं ठरेल घातक

SCROLL FOR NEXT