Pandharpur News Saam Tv
महाराष्ट्र

Ashadhi Wari 2022: आषाढीच्या निमित्ताने तुळशी मळा बनवण्याच्या कामाला वेग

विठ्ठल भक्तांना प्रिय असलेल्या तुळशी माळा बनवण्याची आता लगबग सुरू आहे.

भारत नागणे

पंढरपूर - आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपुरात (Pandharpur) तुळशी माळा बनवण्याच्या कामाला वेग आला आहे. या व्यवसायावर पंढरपुरातील अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो. वारकरी संप्रदायामध्ये तुळशी माळेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. विठ्ठल भक्तांना प्रिय असलेल्या तुळशी माळा बनवण्याची आता लगबग सुरू आहे. पण सध्या या मार्केट मध्ये चायना तुळशी माळा विक्री साठी येत आहेत. त्यामुळे पारंपरिक व्यवसायिकांना याचा मोठा फटका सहन करावा लागत आहे. याशिवाय वारकऱ्यांची फसवणूक देखील होण्याची शक्यता आहे. (Ashadhi Wari 2022 Latest Marathi News)

हे देखील पाहा -

विठोबाला कंठी तुळशी हार आवडीचा आहे. अगदी त्याच पद्धतीने वारकऱ्यांना तुळशीची माळ प्रिय आहे. ज्याच्या गळ्यात तुळशी माळ तो वारकरी अशी ओळख आहे.आषाढी वारी साठी पंढरपुरात काशी कापडी समाजातील लोक तुळशी माळ बनवण्याचा पारंपरिक व्यवसाय करतात. त्यांच्या कुटुंबात आता माळा बनवण्यासाठी लगबग सुरू आहे.

१०८ मण्यांची लहान, मध्यम आणि मोठी अशा आकारातील तुळशी माळ बनवली जाते. पण सध्या या व्यवसायात सुद्धा चायना माळा विक्रीला आल्या आहेत. त्यामुळे या माळा कशा ओळखायच्या हे एक कोडे आहे. पंढरपूर शहरात लगतच्या गावात तुळशीचे उत्पादन घेतले जाते. तुळशी माळ विक्रीतीतून लाखो रूपयांची उलाढाल होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

४ वर्ग, एक खोली अन् एकच शिक्षक... जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षणाची बिकट अवस्था!

Flax Seeds Laddu Recipe : हिवाळ्यात सांधेदुखी होईल दूर, रोज खा जवसाचा पौष्टिक लाडू

Jowar Khichdi Recipe: डाईट सुरु केला आहे पण टेस्टी खायची इच्छा होते? मग रात्री घरी बनवा टेस्टी आणि हेल्दी ज्वारीची खिचडी

Maharashtra Live News Update : रोहित पवारांना नाशिकच्या न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

New Marathi Serial : "प्रेम की पैसा..."; 'झी मराठी'वर सुरू होणार नवीन मालिका, मुख्य भूमिकेत कोण झळकणार?

SCROLL FOR NEXT