Bribe Trap Saam tv
महाराष्ट्र

Pandharpur News : करमाळा भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचा-यास 2500 रुपये घेताना एसीबीने पकडले

शासकीय कर्मचा-यांनी कामाच्या माेबदल्यात अनावश्यक पैसे मागितल्यास एसीबी कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

भारत नागणे

Pandharpur News : करमाळा येथील भूमी अभिलेख कार्यालयातील परिक्षण भूमापक कर्मचा-यास दाेन हजार पाचशे रुपयांची लाच स्वीकारताना सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. खंडू रेंवडे असे अटक केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव असल्याची माहिती एसीबी कार्यालयातून मिळाली. (Maharashtra News)

तक्रारदाराने त्याच्या मोरवड (ता .करमाळा) हद्दीतील जमिनीची मोजणी करून हद्दी निश्चित करणे व हद्दी निश्चित केल्यानंतर त्याची नकाशा प्रिंट काढणे यासाठी तातडीच्या मोजणीसाठी अर्ज केला होता. त्यासाठी आवश्यक असलेली शासकीय तीन हजार रुपये शुल्क चलनाद्वारे भरण्यात आले हाेते.

दरम्यान हे काम करुन देण्यासाठी खंडू रेंवडे याने तीन हजार रुपयांची मागणी केली असता. तडजोडी अंती 2500 रुपये घेताना त्याला एसीबीने साेमवारी पकडले. त्याच्यावर करमाळा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शिवसेना शिष्टमंडळाची महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन देत आंदोलनाचा इशारा

Chilli Potato Recipe: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल चिली पोटॅटो; वाचा खास रेसिपी

Maharashtra To Bihar Amrit Bharat Train: पुणे ते दानापुर दरम्यान धावणार ट्रेन; जाणून घ्या अमृत भारत ट्रेनचा मार्ग, कोचसंख्या टाईमटेबल अन् थांबा

RBI Digital Fraud Rules: डिजिटल फसवणूक प्रकरणी आरबीआयचा मोठा निर्णय; बँक देणार नुकसान भरपाई

Maharashtra Politics: सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा झटका, 'त्या' एका निर्णयामुळे २ बड्या नेत्याचं पद गेलं

SCROLL FOR NEXT