ACB, Bribe, Latur Saam Tv
महाराष्ट्र

Mahavitran : दहा हजार रुपयांची लाच घेताना महावितरणाचा सहायक अभियंता ACB च्या जाळ्यात

या तक्रारीची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली.

दीपक क्षीरसागर

Latur : शेतकऱ्याचा (farmer) विद्युतपंप सुरू ठेवण्यासाठी २५ हजारांची मागणी करून तडजोडीअंती १० हजारांची लाच (bribe) स्वीकारताना महावितरणाच्या (mahavitran) हरंगुळ येथील कार्यालयात कार्यरत असलेल्या सहायक अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) पथकाने रंगेहाथ पकडले. एमआयडीसी पोलिस (police) ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

लातूर शहरालगत असलेल्या हरंगुळ येथील महावितरण कार्यालयात सहायक अभियंता (वर्ग २) माधवराव सुधाकरराव बिराजदार हा सध्या कार्यरत आहे. त्याने नागझरी गावठाण येथील डीपीवरून तक्रारदारासह इतर दोघा शेतकऱ्यांना शेतीचा विद्युत पंप सुरू ठेवण्यासाठी आणि गावठाण डीपीचा शेतीपंपाला वीजपुरवठा सुरू करावा या कामासाठी पहिल्यांदा २५ हजारांच्या लाचेची मागणी केली.

दरम्यान, तडजोड झाल्यानंतर दहा हजार रुपये देण्याचे ठरले. याबाबत लातूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे संबंधित शेतकऱ्याने तक्रार केली. या तक्रारीची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली. (Maharashtra News)

त्यानंतर लातूर शहरातील बार्शी मार्गावर असलेल्या एका बारनजीक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावला. यावेळी ठरल्याप्रमाणे महावितरणचे सहायक अभियंता माधवराव बिराजदार याला दहा हजारांची लाच स्वीकारताना पथकाने रंगेहाथ पकडले. एमआयडीसी पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Musician Death: भारतीय संगीताचा अनमोल ठेवा हरपला; ज्येष्ठ तबला वादक काळाच्या पडद्याआड, संगीतविश्व शोकसागरात

नीटची फेरपरिक्षा कधी होणार? NTA कडून अधिकृत तारीख जाहीर

Maharashtra News Live Update: जालन्यात पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका

Kidney cancer: लहान मुलांमध्ये किडनीच्या कॅन्सरची ही ३ प्रमुख लक्षणं दिसतात; 99% पालक करतात दुर्लक्ष

Raja Shivaji Collection: रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची लवकरच १०० कोटी क्लबमध्ये एन्ट्री; गुरुवारी केली बक्कळ कमाई

SCROLL FOR NEXT