Bribe, chhatrapati sambhaji nagar, dharashiv, bribe Saam Tv
महाराष्ट्र

Dharashiv Crime News : धाराशिव, छत्रपती संभाजीनगरात एसीबीच्या कारवाई; पाेलिसासह घाटीतील लिपिक अटकेत

या कारवाईमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

Siddharth Latkar

- बालाजी सुरवसे / नवनीत तापडिया

Dharashiv Police News : गुटखा , तंबाखू विक्री करू देण्यासाठी एका व्यक्तीकडुन 12 हजारांची लाच घेणाऱ्या धाराशिव शहर पोलिस ठाण्यातील पोलीस हवालदारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. अन्य एका घटनेत छत्रपती संभाजीनगर येथे घाटी रुग्णालयातील बांधकाम विभागाच्या कनिष्ठ लिपिकाला पाच हजार रुपये घेतल्याप्रकरणी एसीबीने पकडले. (Maharashtra News)

गुटखा तंबाखु विक्रीचा व्यवसाय चालु करण्यास व पुन्हा कारवाई न करण्यासाठी धाराशिव शहर पोलिस ठाण्यातील हवालदार महादेव शिंदे यांनी एक व्यक्तीला 15 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. माञ तक्रारदाराने लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.

दरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (acb) सापळा रचुन 12 हजार रुपयांची लाच घेताना हवालदार शिंदे यांना रंगेहाथ पकडुन ताब्यात घेतले. या कारवाईमुळे पाेलिस दलात एकच खळबळ उडाली आहे.

'घाटी' त एसीबीची कारवाई

निविदा दाखल करण्यासाठी लागणारे अनुभव प्रमाणपत्र दिल्याचे बक्षीस म्हणून एका सेवाभावी संस्थेकडून पाच हजार रुपयाची लाच घेणाऱ्या (chhatrapati sambhaji nagar) घाटी रुग्णालयातील बांधकाम विभागाच्या कनिष्ठ लिपिकाला अटक करण्यात आली आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी घाटी परिसरात ही कारवाई केली. रघुनाथ तुकाराम केदारे असे लाचखोर लिपिकाचे नाव आहे. केदारेच्या बाबत 42 वर्षे महिलेने एसीबीकडे तक्रार दिली होती. त्या तक्रारीवरून एसीबीकडून कारवाई करण्यात आली. बेगमपुरा पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र आळंदीमध्ये भक्तिरसाचा अपार उत्सव

Breakfast Recipe: वाटीभर रव्यापासून बनवा 'हा' हेल्दी नाश्ता, टिफिनसाठी सुद्धा ठरेल बेस्ट

Cancer Prevention: 'हे' विशेष प्रथिने कर्करोग वाढण्यापूर्वीच थांबवतात, जाणून घ्या कार्य कसे करते

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशीला उपवासाचे नियम आणि पूजा विधी जाणून घ्या

Metro In Dino Collection : 'मेट्रो इन दिनों'ची उंच भरारी, वीकेंडला किती कोटींची कमाई?

SCROLL FOR NEXT