solapur, mohol, home guard, acb, bribe saam tv
महाराष्ट्र

Mohol Police Station : साहेबाला द्यावे लागतात ! लाचखाेर हाेमगार्डने उडवून दिली माेहाळ पाेलिस ठाण्यात खळबळ

एसीबी या प्रकरणाचा सखाेल तपास करीत आहे.

विश्वभूषण लिमये

Mohol Police Station : दहा हजार रुपयांची लाच घेताना एसीबीच्या पथकाने माेहाेळ पाेलिस स्टेशनमधील हाेमगार्डला पकडले. संबंधित हाेमगार्डने साहेबांना द्यावे लागतात असे सांगितल्याने एसीबीचे पथक या प्रकरणाचा सखाेल तपास करीत आहे. एसबीबीने संबंधित हाेमगार्डवर पाेलिस (police) ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

एसीबीने (ACB) लाच घेताना पकडलेल्या संशयित आराेपी हाेमगार्डचे नाव दत्तात्रय मोरे असे आहे. चोरीच्या गुन्ह्यात जामीनासाठी मदत करतो असे सांगत त्याने तक्रारदाराकडे पंधरा हजार रुपयांची लाच (bribe) मागितली हाेती.

त्यानंतर एसीबीने सापळा रचला. या सापळ्यात दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना दत्तात्रय मोरे अलगद अडकला. माेरे याला लाच घेताना मोहोळ पोलीस ठाण्यात पकडल्याने पाेलिस दलात खळबळ उडाली. (Maharashtra News)

दरम्यान माेरे याने मोहोळ पोलीस ठाणे परिसरात 'साहेबांना द्यावे लागतात' म्हणून चोरीच्या गुन्ह्यातील संशयिताला जामीनासाठी मदत करण्यासाठी दहा हजार घेतल्याचे सांगितले. गेल्या आठ दिवसांत ग्रामीण पोलिसांवरील ही दुसरी कारवाई आहे. या होमगार्डचा साहेब नेमका कोण हा प्रश्न सध्या अनुत्तरीतच आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मलंगगड ग्रामीण भागात वीज पुरवठा खंडित होत असल्याने शिवसेना आक्रमक

MLC Election: मोठी राजकीय घडामोड! निवडणुकीआधी NDA ला मिळाली खूशखबर; ऐनवेळी बंडखोर उमेदवाराची माघार

Ideal age gap in marriage: सुखी संसारासाठी नवरा-बायकोच्या वयात किती अंतर असावं?

कल्याण कोर्टात पगारवाढीसाठी आंदोलन, २० महिन्यांनंतरही दखल नाही, ५ तारखेला सामूहिक रजेवर जाणार

सलग तीन दिवस सुट्टी जाहीर! शाळा-कॉलेज, सरकारी कार्यालय राहणार बंद; 'या' राज्याच्या मुख्यमंत्र्यांची घोषणा

SCROLL FOR NEXT