Crime News Google
महाराष्ट्र

Crime : संतापजनक! दारू पाजून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; गुन्हेगाराला अटक

मावळ तालुका पुन्हा एकदा धक्कादायक घटनेनं हादरला आहे.

दिलीप कांबळे

लोणावळा - मावळ(Maval) तालुका पुन्हा एकदा धक्कादायक घटनेनं हादरला आहे. नेपाळ (Nepal) येथून पोटाची खडगी भरण्यासाठी लोणावळ्यात आलेल्या कुटुंबातील एका तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्या नातेवाईकाने दारू पाजून अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी (Police) तात्काळ या गुन्ह्यातील आरोपीला अटक केलं आहे. (Maval Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहिती वरून मंगळवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास लोणावळा शहराजवळ असलेल्या वरसोली, गावात वरील संतापजनक प्रकार घडला आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी लोणावळा पोलिसात फिर्याद दिली आहे. शंकर बहाद्दूर थापा असे या नराधमाचे नाव आहे.

आरोपी शंकर याने पीडित मुलगी आणि तिचा सात वर्षीय भाऊ यांना भाजीपाला खरेदी करण्यासाठी म्हणून घरातून बाहेर नेले. त्यानंतर त्यांना एका पडीक जमिनीवर घेऊन जाऊन पीडित मुलीला त्याठिकाणी दारू पाजून तिच्यावर शारीरिक अत्याचार केले. (Latest Marathi News)

याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी संबंधित नराधमाला अटक केली असून, न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सदर नराधम हा मूळचा नेपाळमधील अझाम येथील असून, तो सध्या लोणावळ्या जवळील वरसोली येथे वास्तव्यास आहे. या प्रकरणाचा पुढील तपास लोणावळा शहर पोलीस उपनिरीक्षक सुरेखा शिंदे या करत आहेत.

Edited By - Shivnai Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: विलास घुले हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कार आणि चाकू SIT कडून जप्त

Mobile Recharge Under 200: फक्त 199 रुपयांत 28 दिवसांची वैधता; Jio, Airtel, Vi चा जबरदस्त रिचार्ज प्लान

एकनाथ शिंदेंचा पाटलांना मोठा धक्का! TDCC निवडणुकीत सहकार पॅनलचा दणदणीत विजय, मोठा उलटफेर

सौदी अरबमध्ये हेलिकॉप्टर क्रॅश; भीषण अपघातात १४ जणांचा मृत्यू

Pune Rainfall: पुणे जिल्ह्याला पावसाने झोडपलं, ढगफुटीसदृश्य परिस्थिती; जनजीवन विस्कळीत, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT