abhijeet patil donates one lakh ruppees to swapnil lonkar family 
महाराष्ट्र

स्वप्नील लोणकर कुटुंबियास लाखाची मदत; आधार देणं हे कर्तव्य

भारत नागणे

पंढरपूर : घरातील कर्ता विशेषत: तरुण मूलगा गेल्यानंतर त्या कुटुंबाला आधार देण्याची गरज असते. त्या कुटुंबाला काय हवं काय नकाे हे पाहण्याची गरज असते. स्वप्नील उमद्या वयात गेल्याने त्याच्या कुटुंबास मदत करणे हे युवा पिढींच कर्तव्य आहे. ते बजावत असल्याचे धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन व पंढरपूरचे युवा नेते अभिजीत पाटील यांनी नमूद केले.

एमपीएससी MPSC मध्ये अव्वल आलेल्या स्वप्नील लोणकर swapnil lonkar याने नोकरी मिळत नसल्याने नुकतीच आत्महत्या केली. यामुळे लोणकर कुटुंबास मोठा धक्का बसला. स्वप्नील हा लाेणकर कुटुंबाचा आधार हाेता. ताे गेल्याने स्वप्नीलचे कुटुंबीय व्यथित झाले. अनेकांनी लाेणकर कुटुंबियांना धीर देण्याचा प्रयत्न केला.

या कुटुंबास आपली मदत व्हावी या हेतुने पंढरपूर येथील उद्योजक अभिजीत पाटील यांनी लोणकर कुटुंबीयांची भेट घेऊन एक लाख रूपयांची मदत दिली‌ abhijeet patil donates one lakh ruppees to swapnil lonkar family ही मदत नसून आमचे कर्तव्य असल्याचे पाटील यांनी नमूद केले.

लोणकर‌ कुटुंबातील एकूलता एक तरूण मुलगा गेल्याने कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाला आधार देण्याची गरज आहे. फुल ना फुलाची पाकळी म्हणून सामाजिक बांधिलकीच्या नात्याने दानशूर व्यक्तींनी लोणकर कुटुंबाला मदत करावी असे आवाहन पाटील यांनी केले आहे.

Edited by : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Surya Gochar 2026: 17 सप्टेंबरला सूर्य करणार राशीबदल; बुधादित्य राजयोगामुळे या 7 राशींचे सुरू होणार अच्छे दिन

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! ₹2,000 मिळवायचे असतील तर आताच करा ही 3 कामे; अन्यथा अडकू शकतो हप्ता

Chocolate Cake Cookies: चॉकलेट केक आणि कुकीजचा भन्नाट कॉम्बो! घरी बनवा मऊ आणि क्रंची चॉकलेटी केक कुकीज

Maharashtra News Live Update: बाप्पासाठी चांदीचा थाट! येवल्यात चांदीचे मोदक, फुलं अन् उंदीरमामांची क्रेझ

Vastu Shastra : स्वयंपाक घरात देवघर असावे की नसावे? वास्तुशास्त्राचे नियम पाळल्यास घरात नांदेल सुख-समृद्धी

SCROLL FOR NEXT