TEACHER RECRUITMENT PROTEST: ABHIJIT DIPKE DEMANDS ACTION FOR MAHARASHTRA SCHOOLS saam tv
महाराष्ट्र

शिक्षक भरतीसाठी दिपकेंचं आंदोलन; 'स्कूल ठीक करो' अभियानातून शाळा सुधारणार?

Abhijeet Dipke Protest For Teacher Recruitment : महाराष्ट्रातील शाळांची स्थिती सुधारण्यासाठी ‘स्कूल ठीक करो’ अभियान सुरू करणारे अभिजीत दीपके आता शिक्षक भरतीच्या मागणीसाठी आंदोलनात उतरले आहेत.

Bharat Jadhav

  • राज्यातील शिक्षक भरतीच्या मागणीसाठी अभिजीत दीपके आंदोलनात उतरले

  • ‘स्कूल ठीक करो’ अभियानाच्या माध्यमातून सरकारी शाळांच्या समस्या समोर आणल्या

  • मराठवाड्यातील जिल्हा परिषद शाळांच्या पाहणीत शिक्षकांच्या कमतरतेचा मुद्दा समोर आल्याचा दावा

राज्यातल्या शाळा सुधारण्य़ासाठी अभियान सुरू केलेले सीजेपीचे दिपके आता शिक्षक भरतीसाठी मैदानात उतरले आहेत. त्यांनी मराठवाड्यातल्या शाळांचा दौरा केला तेव्हा धक्कादायक वास्तव समोर आलंय. नेमकं काय सुरू आहे झेडपी शाळांमध्ये? दिपकेंचा काय पाहून संताप झाला? यावरचा हा रिपोर्ट.

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर स्कूल ठिक करो अभियान सुरु करणारी सीजेपी आता शिक्षकभरतीसाठी आक्रमक झालीये. मराठवाड्यातल्या अपुऱ्या सोयीसुविधा आणि शिक्षकांच्या कमतरतेमुळे शाळांची अवस्था दयनीय झालीय. अभिजित दिपकेंनी हिंगोली जिल्ह्यातील एमआयडीसी लिंबाळ्यातील एका शाळेची पाहणी केली.

यावेळी त्य़ांना धक्कादायक चित्र आढळून आलं. इथली अवस्था पाहताच भडकलेल्या अभिजीत दिपकेंनी पुन्हा आंदोलनाचं हत्यार उगारत ठिय्या मांडला. जोपर्यंत शिक्षक भरती होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा दिपकेंनी दिलाय. प्रत्येकाला शिक्षणाचा अधिकार आहे असं सांगत छाती बडवणाऱ्या प्रत्येकानं शाळांची आणि शिक्षकांची अवस्था पाहून ती सुधारण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.

देशभरात तब्बल 1 लाखांहून अधिक शाळा एक शिक्षकी

राज्यातील तब्बल 9 हजार 239 शाळा एका शिक्षकाच्या भरवशावर

राज्यात 30 हजारांहून अधिक शिक्षकांची पदं रिक्त

राज्यातल्या सरकारी शाळांमधल्या दयनीय अवस्थेविरोधात सीजेपीनं शाळा सुधार मोहीम सुरू केलीय. मात्र दिपकेंना हिंगोलीतल्या लिंबाळ्यातल्या या झेडपी शाळेतील दारूड्या मुख्याध्यापकाचा व्हिडिओ हाती लागला आणि त्यांनी हा व्हिडिओ पोस्ट केला आणि या शाळेत धडक देत मोहिमेला सुरूवात केली. मात्र दिपकेंच्या भेटीचा धसका घेतलेल्या जिल्हा प्रशासनानं दारूड्या मुख्याध्यापकाला निलंबित केलं. मात्र यामुळे झेडपी शाळांचा बुरखा पुन्हा एकदा टराटरा फाटला.

राज्यात शिक्षणाचा दर्जा सुमार असल्याचं अभिजित दिपकेंच्या स्कूल ठिक करो अभियानाच्या काही दिवसातच समोर आलं. मात्र यातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जोपर्यंत सरकारी शाळांचे शिक्षक आपल्या मुलांना ते शिकवत असलेल्या शाळांमध्ये पाठवत नाहीत तोपर्यंत गरिबांच्या आणि शेतकऱ्यांच्या मुलांना शिकवणाऱ्या या शाळांची अवस्था अशीच राहणार याबाबत तीळमात्र शंका नाही. मात्र आता दिपकेंच्या आंदोलनामुळे सरकार आणि शिक्षक जागे होणार का? हा खरा प्रश्न आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Woman Fitness Tips: पाठदुखी, थकवा आणि अशक्तपणा होईल दूर; महिलांनी रोजच्या सवयींमध्ये करा हे 8 बदल

Gold Rate Today: सोन्याच्या दरात सर्वात मोठा बदल, प्रतितोळा १२०० रूपयांनी भाव बदलला, वाचा ताजे दर

Maharashtra News Live Update: नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडप्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी

Red Velvet Cake Recipe: घरच्या घरी बनवा मऊ, स्पाँजी आणि क्रीमी रेड वेलवेट केक, वाचा रेसिपी

Congress : काँग्रेसचा धक्कादायक निर्णय! भाजपमध्ये गेलेल्या ७९ नेत्यांवर निलंबनाची कारवाई; राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT