Abhijeet Bichukale, Kasba Peth Bypoll Election Result, Udayanraje Bhosale, Sharad Pawar saam tv
महाराष्ट्र

Abhijeet Bichukale : कसब्यातील पराभवावर अभिजीत बिचकुले म्हणाले उदयनराजेंनी... (पाहा व्हिडीओ)

आज कसबा विधानसभा पाेटनिवणुकीचा निकाल जाहीर लागला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Abhijeet Bichukale : कसबा विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल लागला आहे.(Kasba Peth Bypoll Election Result) या निवडणुकीत मविआच्या रवींद्र धंगेकर (ravindra dhangekar) यांनी बाजी मारली तर भाजपच्या हेमंत रासने यांचा पराभव झाला आहे. त्यामुळे भाजपचा बालेकिल्ला ढासळला आहे. या निवडणुकीत बिग बाॅस फेम अभिजीत बिचुकलेंचा देखील पराभव झाला आहे.

दरम्यान या निवडणुकीत पराभव झाला असला तरी लोकांच्या प्रश्नांसाठी मी लढत राहणार. जय-पराजय या गाेष्टी होत राहतात असे अपक्ष उमेदवार बिग बाॅस फेम अभिजीत बिचुकले यांनी (Abhijeet Bichukale Latest News) साम टीव्हीशी बाेलताना नमूद केेले.

सव्वा लाखांनी उदयनराजेंचा पराभव...

अभिजीत बिचुकले म्हणाले आज पराभव झाला असला तरी जनतेच्या मनात एक ना एक दिवस अढळ स्थान निर्माण करीन. साता-यात उदयनराजे भाेसले (udayanraje bhosale) यांचा सव्वा लाखांनी पराभव झाला हाेता. म्हणून त्यांनी समाजकारण साेडले नाही. मी तर स्वत:च्या मनगटाच्या बळावर समाजकारण करीत आहे.

शरद पवार देशाचे नेते म्हणवतात...

फक्त चार खासदार असलेले शरद पवार (sharad pawar) हे देशाचे नेते म्हणवतात. आत्ता मी हरलाे असलाे तरी उद्याचा शंभर टक्के नेता असल्याचे आत्मविश्वासने बिचुकलेंनी नंमूद केले.

दरम्यान या निवडणुकीत पैसा, मद्य याचा वापर झाल्याचा दावा बिचुकलेंनी केला. ते म्हणाले लाेकांना काय वाटतं त्यांनी ते केलं. लाेकांना दारु, मटण, पैसा हेच हवं असेल तर ते माझ्याकडे येणार नाहीत असेही बिचुकलेंनी म्हटलं. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Language Row : मीरा-भाईंदरमध्ये मोर्चा काढणाऱ्या व्यापाऱ्यांची दिलगिरी; मराठी अस्मिता मोर्चाआधीच निर्णय

Amravati News: अमरावतीत बॉम्बची अफवा, 'या' परिसरात शोधमोहीम सुरू, पोलिसांचा मोठा फौजफाटा|VIDEO

Salt Scrub : मीठाचे पाणी त्वचेसाठी चांगले आहे का?

Railway : रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय! ट्रेन सुटण्याच्या ८ तास आधी पहिला आरक्षण चार्ट प्रसिद्ध केला जाणार

Maharashtra Live News Update : अलिबाग येथे नव्याने उभारण्यात आलेल्या PNP नाट्यगृहाचे शरद पवार यांच्या हस्ते लोकार्पण

SCROLL FOR NEXT