Abdul Sattar  Saam TV
महाराष्ट्र

'राजीनामा घेऊच तोही व्याजासहित..,' राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचं ट्विट; अब्दुल सत्तारांची खुर्ची जाणार?

नेहमी कोणत्या-कोणत्या कारणांनी चर्चेत राहणारे अब्दुल सत्तार पुन्हा एकदा विरोधकांच्या आरोपावरून चर्चेत आले आहे.

साम टिव्ही ब्युरो

नागपूर : नेहमी कोणत्या-कोणत्या कारणांनी चर्चेत राहणारे अब्दुल सत्तार पुन्हा एकदा विरोधकांच्या आरोपावरून चर्चेत आले आहे. अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्यावर आता जमीन घोटाळ्याचा आरोप होत आहे. इतकंच नाही तर, विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी सुद्धा केली आहे. यावर आज सत्तार हे विधिमंडळात उत्तर देणार आहे. (Latest Marathi News)

या सर्व घडामोडी दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी एक सूचक ट्विट केलं आहे. 'राजीनामा घेऊच तोही व्याजासहित..,' असं मिटकरी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. त्यामुळे आज विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात नेमकं काय होणार? याकडेचं सर्वांचं लक्ष लागून आहे.

सत्तार यांच्यावर आरोप काय?

शिंदे-भाजप सरकारमधील कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर गायरान जमीन घोटाळ्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. सत्तार यांनी वाशिमच्या घोड बाभूळ परिसरातील 37 एकर 19 गुंठे गायरान जमिनीचं सत्तार यांनी एका व्यक्तीला अनधिकृत रित्या वाटप केल्याचा आरोप आहे. यावरून विधानसभेत अजित पवारांसह विरोधकांनी अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. (Maharashtra Political News)

अब्दुल सत्तार आज काय बोलणार?

गायरान जमीन वाटपावरून विरोधकांकडून आरोप होत असतानाच अब्दुल सत्तार यांनी माध्यमांपासून दोन हात लांब राहणे पसंद केले आहेत. तर अब्दुल सत्तार नॉट रिचेबल असल्याच्या बातम्या देखील समोर आल्या आहेत. मात्र अशात अब्दुल सत्तार यांनी माध्यमांना रात्री उशीरा प्रतिक्रिया दिली.

माझ्यावर झालेले आरोप सभागृहात झाले असल्याने याला उत्तर देखील सभागृहातच देणार असल्याचं अब्दुल सत्तार यांनी सांगितलं. त्यामुळे आता अब्दुल सत्तार उद्या काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: मोदी सरकार बेरोजगारांना २,५०० रुपये देणार? काय आहे केंद्राच्या योजनेचं सत्य?

वयाची तिशी गाठलेल्यांनाही होतोय डायबिटीज; 'ही' 5 लक्षणं दिसताच करा चेकअप

Made in Pakistan Cosmetics: पाकच्या सौंदर्यप्रसाधनांचा राज्यात सुळसुळाट; ‘गोरी ब्युटी क्रीम’चं संगमनेर कनेक्शन

Pakistan Blast: शांतता रॅलीदरम्यान मोठा स्फोट; ७ जण ठार, १८ जखमी

'सर्वच क्षेत्रात वजन कमी, येणारा काळ आपलाच, आम्हाला बोलता न येणारी खाती मिळाली, मुंडे भाऊ-बहिणीच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT