हमी पेक्षा कमी भाव दिल्यास जेलची हवा; अब्दुल सत्तार  Saam Tv
महाराष्ट्र

हमी पेक्षा कमी भाव दिल्यास जेलची हवा; अब्दुल सत्तार

शेतकऱ्यांच्या मालाला हमी भावापेक्षा कमी भाव दिला, तर व्यापारी किंवा आडत दुकानदारांना जेलची हवा खावी लागणार

डॉ. माधव सावरगावे

औरंगाबाद : शेतकऱ्यांच्या मालाला हमी भावापेक्षा कमी भाव दिला, तर व्यापारी किंवा आडत दुकानदारांना जेलची हवा खावी लागणार आहे. अतिवृष्टी आणि पुरातून कसे- बसे सावरलेल्या शेतकऱ्यांना अडचणीत आणल्यास सरकार कुणालाही सोडणार नाही, असा इशारा महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी खाजगी व्यापारी आणि आडत दुकानदाराना दिला आहे.

हे देखील पहा-

सध्या बाजारामध्ये सोयाबीन, मका, कापूस ही नगदी पिके बाजारात विक्रीसाठी शेतकरी आणत आहेत. मात्र, खाजगी व्यापारी, दुकानदार हे वाटेल त्या भावात खरेदी करत असल्याची तक्रार शेतकऱ्यांची आहे. आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी अधिक अडचणीत सापडलेला आहे.

काही दिवसापूर्वी १० हजारावर पोहोचलेलं सोयाबीन आता ४ हजार रुपयांमध्ये खरेदी केले जात आहे. ही स्थिती कापूस आणि मकाची झाली आहे. त्यामुळे आधारभूत किंमत म्हणजे हमीभावापेक्षा कमी दराने शेतकऱ्यांच्या मालाची खरेदी केल्यास महाराष्ट्र सरकारने जो कायदा केला आहे, त्यानुसार दुकानदार, आडत व्यापारी यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.

शेतकऱ्यांनी अडत व्यापारी किंवा दुकानदाराने हमीभावापेक्षा कमी दराने जर खरेदी केली असेल, तर त्याची पावती दुकानदाराचे नाव ही माहिती द्यावी. त्यानंतर थेट त्या दुकानदार व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत, असे आवाहनही महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी केलं आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

इराणमध्ये अमिरेकन लढाऊ विमान कोसळलं, पायलटला पकडण्यासाठी बक्षीस केलं जाहीर, VIDEO

Fact Check: केंद्र सरकारची वर्क फ्रॉम होम योजना? महिलांना 25 हजार मानधन मिळणार?

Ashok Kharat: मुलानेच उघड केलं खरातचं हवाला कांड? चौकशीदरम्यान SIT ला सांगितली धक्कादायक माहिती

अवकाळी पावसाने वाजवले स्मार्ट सिटीचे तीनतेरा; स्मार्ट सिटी की 'नरक' सिटी, पुणेकरांचा संताप

Earthquake: दिल्लीसह उत्तर भारत भूकंपाच्या धक्क्याने हादरला, नागरिक घाबरून घराबाहेर पळाले; VIDEO समोर

SCROLL FOR NEXT