Abdul Sattar Aggressive CM Eknath Shinde PA Saam TV
महाराष्ट्र

Abdul Sattar : अब्दुल सत्तारांची थेट CM शिंदेंच्या पीएनांच शिवीगाळ? वर्षा बंगल्यावर काय घडलं?

सत्तार यांनी थेट शिंदे यांच्यासमोरच त्यांच्या खासगी सचिवाला शिविगाळ केल्याचं सूत्रांनी सांगितले.

साम टिव्ही ब्युरो

Abdul Sattar Latest News : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येतेय. राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे स्वीय सहाय्यक यांच्यात बाचाबाची झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. माझं काम का नाही केलं? असा जाब विचारत सत्तार यांनी थेट शिंदे यांच्यासमोरच त्यांच्या खासगी सचिवाला शिविगाळ केल्याचं सूत्रांनी सांगितले. (Abdul Sattar News Today)

निवडणूक आयोगाने शिवसेनेचे निवडणूक चिन्ह आणि नाव गोठवल्यानंतर पुढील रणनीति ठरवण्यासाठी शिंदे गटाने वर्षा बंगल्यावर बैठक बोलावली होती. या बैठकीत ही बाचाबाची झाली असल्याची माहिती आहे. शिविगाळ प्रकरणानंतर सत्तार यांनी वर्षा बंगल्यातील बैठक अर्ध्यावर सोडली आणि माघारी गेले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

नेमकं काय घडलं?

निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शिंदे गटाच्या खासदार, आमदार, पदाधिकाऱ्यांची बैठक वर्षा बंगल्यावर बोलवण्यात आली होती. या बैठकीला कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचीही उपस्थिती होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या बैठकीत कामकाजाचा आढावाही घेत होते. यावेळी बैठकीला उपस्थित असलेले अब्दुल सत्तार हे अचानक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खासगी सचिवांवर भडकले आणि त्यांना शिविगाळ केली.

अब्दुल सत्तार यांच्या या वागणूकीमुळे शिंदे गटाच्या नेत्यांना धक्का बसला. शिंदे गटातील मंत्र्यांनी आणि आमदारांनी या प्रकरणी मध्यस्थी केली. शिविगाळ प्रकरणानंतर सत्तार यांनी वर्षा बंगल्यातील बैठक अर्ध्यावर सोडली आणि माघारी गेले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दरम्यान, सत्तार यांच्या वागणुकीमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. राज्याच्या कृषी मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांच्या खासगी सचिवाला शिविगाळ करणे हा प्रकार धक्कादायक असल्याचे म्हटले जात आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबईतील ताज हॉटेलला बॉम्बने उडवून देण्याची धमकीचा कॉल

पावसाळ्यात मिळणारी चमचमीत आणि औषधी तरोटा भाजी, एकदा तरी नक्की खा

8th Pay Commission : फिटमेंट फॅक्टर 3 टक्क्यांपेक्षा कमीच राहणार? आठव्या वेतनाबाबत आली मोठी अपडेट

Water Metro: मुंबईत तयार होणार जगातील सर्वात मोठं वॉटर मेट्रो नेटवर्क, कुठून कसा प्रवास अन् काय आहे विशेष?

Burping Remedies : जेवल्यानंतर सतत ढेकर येतात? आजपासूनच करा 'हा' रामबाण उपाय

SCROLL FOR NEXT